Seo Services

Featured post

भारत जगाचं औषधालय बनल असून, आता जगाचा उत्पादक बनण्याची वेळ आली आहे - डॉ. मनसुख मांडवीय

  नवी दिल्ली : “भारत जगाचं औषधालय (फार्मसी) बनला असून, आता जगाचा उत्पादक (फॅक्टरी) बनण्याची वेळ आली आहे.” असं केन्द्रीय आरोग्य मंत्री डॉ मनस...

Seo Services

भारत जगाचं औषधालय बनल असून, आता जगाचा उत्पादक बनण्याची वेळ आली आहे - डॉ. मनसुख मांडवीय

 

नवी दिल्ली : “भारत जगाचं औषधालय (फार्मसी) बनला असून, आता जगाचा उत्पादक (फॅक्टरी) बनण्याची वेळ आली आहे.” असं केन्द्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. 'भारतातील रसायने आणि पेट्रोकेमिकल उत्पादन केन्द्र' या विषयावर नवी दिल्ली इथं आयोजित तिसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभात ते काल बोलत होते. "शाश्वतता आणि वर्तुळाकार परिपूर्णता" ही परिषदेची संकल्पना होती. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघानं (फिक्की) याचं आयोजन केलं होतं. विविध क्षेत्रातील घटकांनी यात भाग घेतला.

भारत जगाचं औषधालय बनल असून, आता जगाचा उत्पादक बनण्याची वेळ आली आहे - डॉ. मनसुख मांडवीय भारत जगाचं औषधालय बनल असून, आता जगाचा उत्पादक बनण्याची वेळ आली आहे - डॉ. मनसुख मांडवीय Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on July 29, 2023 Rating: 5

भारतीय जनता पक्षानं संभाजी भिडें संदर्भात, आपली भूमिका स्पष्ट करावी अशी नाना पटोले यांची मागणी

 

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अवमान करणार्‍या संभाजी भिडेंसंदर्भात, भारतीय जनता पक्षानं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महनीय व्यक्तींचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींच्या केवळ मुसक्या न आवळता त्यांना फाशी दिली पाहिजे असं गृहमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटल्याचा दावा करत, फडनवीस आता काय कारवाई करणार, असा प्रश्नही पटोले यांनी विचारला आहे. संभाजी भिडेना अटक करुन कठोर कारवाई होईपर्यंत काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पुणे, सातारा, बुलडाणा, मोताळा, जळगाव जामोद सह आज राज्यभर, काँग्रेसच्या वतीनं संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर आंदोलन करू असा इशारा, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी दिला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी धुळे इथं, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन केलं, त्यावेळी ते बोलत होते. 

यवतमाळमध्ये भिडे यांच्याविरोधात, काँग्रेस, आंबेडकरी जनआक्रोश मोर्चा आणि विविध संघटनांनी तीव्र आंदोलन केलं. व्याख्यान आणि अन्य कार्यक्रमांसाठी यवतमाळमध्ये संभाजी भिडे यांचं आज आगमन होताच, हे आंदोलन करत, त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले फलक फाडण्यात आले. भिडेंना काळे झेंडे दाखवणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

भारतीय जनता पक्षानं संभाजी भिडें संदर्भात, आपली भूमिका स्पष्ट करावी अशी नाना पटोले यांची मागणी भारतीय जनता पक्षानं संभाजी भिडें संदर्भात, आपली भूमिका स्पष्ट करावी अशी नाना पटोले यांची मागणी Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on July 29, 2023 Rating: 5

मेमरिज नेव्हर डाय या पुस्तकाचं केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन

 

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या मेमरिज नेव्हर डाय या पुस्तकाचं प्रकाशन केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलं. शहा तमिळनाडूतल्या रामनाथपूरम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्या दरम्यान हा प्रकाशन समारंभ झाला. हे पुस्तक डॉ एपीजेएम नसिमा माराईकायर आणि शास्त्रज्ञ डॉ. वाय एस रंजन यांनी लिहिलं आहे. 

मेमरिज नेव्हर डाय या पुस्तकाचं केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन मेमरिज नेव्हर डाय या पुस्तकाचं केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on July 29, 2023 Rating: 5

सेमीकॉन कार्यक्रमाअंतर्गत सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्था तयार करण्यावर केंद्र सरकारचा भर

 

नवी दिल्ली : लोकांच्या दैनंदिन जीवनात सेमीकंडक्टरची भूमिका महत्त्वाची आहे आणि सेमीकॉन कार्यक्रमाअंतर्गत सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्था तयार करण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज सांगितलं. गुजरातमधल्या गांधीनगर इथं तीन दिवसीय सेमीकॉन इंडिया २०२३ चं उद्घाटन काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या  हस्ते झालं. परिषदेच्या आज दुसऱ्या दिवशी चंद्रशेखर वार्ताहरांशी बोलत होते. देशात सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्रात चीप जुळणी, उत्पादन तसंच संशोधन आणि विकासाला चालना दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.  बंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था आणि लाम रिसर्च इंडिया यांच्यात सेमीकंडक्टर फॅब्रिकेशनविषयक अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.  

सेमीकंडक्टरच्या संरचना आणि उत्पादनाचं केंद्र म्हणून भारताला जगापुढे प्रदर्शित करण्यासाठी इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत ‘भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेस चालना’ या संकल्पनेवर, ही  परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत २३ हून अधिक देशांतील ८,००० पेक्षा अधिक मान्यवर उपस्थित आहेत.  सेमीकॉन इंडिया २०२३ मध्ये मायक्रॉन टेक्नॉलॉजी, अप्लाइड मटेरियल्स, फॉक्सकॉन, कॅडेन्स, एएमडी आणि सेमी  सारख्या औद्योगिक संघटना यांच्यासह प्रमुख जागतिक कंपन्यांमधील उद्योगांचे प्रमुख  सहभागी झाले आहेत.

सेमीकॉन कार्यक्रमाअंतर्गत सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्था तयार करण्यावर केंद्र सरकारचा भर सेमीकॉन कार्यक्रमाअंतर्गत सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्था तयार करण्यावर केंद्र सरकारचा भर Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on July 29, 2023 Rating: 5

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे ४ हजार ८२ सदनिका विक्री सोडतीत १ लाख २० हजार १४४ अर्जांचा सहभाग

 

मुंबई : म्हाडातर्फे मुंबईतल्या विविध गृहनिर्माण योजनां अंतर्गत उभारण्यात आलेल्या ४ हजार ८२ सदनिकांच्या विक्रीसाठी आलेल्या १लाख ४५हजार ८४९ अर्जांपैकी १ लाख २०हजार १४४ अर्ज संगणकीय सोडतीत सहभागी होणार आहेत. यामाध्यमातून मंडळाकडे अंदाजे रुपये ५१९ कोटींचा अनामत रकमेचा भरणा झाला आहे. अपात्र अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा मंडळातर्फे तातडीनं करण्यात येणार आहे. मुंबई मंडळाच्या सदनिका विक्री सोडतीत सहभाग घेणाऱ्या पात्र अर्जदारांची सूची म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर काल प्रसिद्ध करण्यात आली आहे.  

मुंबई मंडळातर्फे विक्रीकरता जाहीर करण्यात आलेल्या ४०८२ सदनिकांमध्ये प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत १९४७ सदनिकांचा समावेश आहे. सोडतीचं स्थळ आणि दिनांक मंडळातर्फे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.  

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे ४ हजार ८२ सदनिका विक्री सोडतीत १ लाख २० हजार १४४ अर्जांचा सहभाग म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे ४ हजार ८२ सदनिका विक्री सोडतीत १ लाख २० हजार १४४ अर्जांचा सहभाग Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on July 29, 2023 Rating: 5

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शेतीआधारित उद्योगांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचं मत

 

मुंबई : विदर्भासह संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेती सोबतच शेतीवर आधारित उद्योगांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. शेती आधारित व्यवसायांचं सकल देशांतर्गत उत्पन्न देशाच्या एकूण उत्पन्नाच्या 20 टक्क्यांवर पोहोचणं अतिशय आवश्यक असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल व्यक्त केलं.

अमरावती जिल्ह्यात नांदुरा इथं उभारलेल्या राज्यातल्या पहिल्या पशुचिकित्सालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शेतीला तंत्रज्ञानाची जोड आणि गोपालन व्यवसायाला अत्याधुनिक स्वरूप देऊन विदर्भातही दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेता येऊ शकेल आणि येत्या काळात विदर्भात देखील दूध क्रांती घडेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. अमरावती इथल्या विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा समारोपही काल नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाला. तंत्रज्ञानात होणाऱ्या नवनवीन आविष्कारांचा वेध घेऊन संस्थेनं गुणवत्तात्मक संशोधन अभ्यासक्रमाला प्राधान्य द्यावं, असं आवाहन गडकरी यांनी या कार्यक्रमात केलं.

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शेतीआधारित उद्योगांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचं मत शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शेतीआधारित उद्योगांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचं मत Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on July 29, 2023 Rating: 5

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव मदत तसंच दुकानदार, टपरीधारकांनाही आर्थिक मदत देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन


मुंबई : राज्यातल्या आपत्तीग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या तातडीच्या अनुदानाची रक्कम दुप्पट म्हणजेच प्रति कुटुंब १० हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून, दुकानदारांना ५० हजार रुपयांपर्यंत, तर टपरीधारकांना १० हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली. ही वाढीव मदत यंदाच्या जून ते ऑक्टोबर दरम्यानच्या नैसर्गिक आपत्तीतल्या बाधितांना दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. 

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव मदत तसंच दुकानदार, टपरीधारकांनाही आर्थिक मदत देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव मदत तसंच दुकानदार, टपरीधारकांनाही आर्थिक मदत देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on July 29, 2023 Rating: 5
ads 728x90 B
Powered by Blogger.