Seo Services
Seo Services

भारतीय जनता पक्षानं संभाजी भिडें संदर्भात, आपली भूमिका स्पष्ट करावी अशी नाना पटोले यांची मागणी

 

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अवमान करणार्‍या संभाजी भिडेंसंदर्भात, भारतीय जनता पक्षानं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महनीय व्यक्तींचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींच्या केवळ मुसक्या न आवळता त्यांना फाशी दिली पाहिजे असं गृहमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटल्याचा दावा करत, फडनवीस आता काय कारवाई करणार, असा प्रश्नही पटोले यांनी विचारला आहे. संभाजी भिडेना अटक करुन कठोर कारवाई होईपर्यंत काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पुणे, सातारा, बुलडाणा, मोताळा, जळगाव जामोद सह आज राज्यभर, काँग्रेसच्या वतीनं संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर आंदोलन करू असा इशारा, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी दिला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी धुळे इथं, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन केलं, त्यावेळी ते बोलत होते. 

यवतमाळमध्ये भिडे यांच्याविरोधात, काँग्रेस, आंबेडकरी जनआक्रोश मोर्चा आणि विविध संघटनांनी तीव्र आंदोलन केलं. व्याख्यान आणि अन्य कार्यक्रमांसाठी यवतमाळमध्ये संभाजी भिडे यांचं आज आगमन होताच, हे आंदोलन करत, त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले फलक फाडण्यात आले. भिडेंना काळे झेंडे दाखवणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

भारतीय जनता पक्षानं संभाजी भिडें संदर्भात, आपली भूमिका स्पष्ट करावी अशी नाना पटोले यांची मागणी भारतीय जनता पक्षानं संभाजी भिडें संदर्भात, आपली भूमिका स्पष्ट करावी अशी नाना पटोले यांची मागणी Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on July 29, 2023 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.