Seo Services
Seo Services

धनगर समाजाच्या आंदोलनात सहभागींवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणार


Image result for महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मुंबई : धनगर समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली असून या समितीची पहिली बैठक होणार आहे. त्याचबरोबर धनगर समाजाच्या आंदोलनात सहभागींवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.

धनगर समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून त्याबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार असल्याचे श्री. पाटील यांनी शुक्रवारी आंदोलकांना भेटून सांगितले होते. त्यापार्श्वभूमीवर समिती स्थापन झाली असल्याचे त्यांनी सांगितले. या समितीमध्ये विविध विभागाचे मंत्री , सचिव यांचा सहभाग आहे. धनगर समाजाला विविध सुविधा देण्यासंदर्भात या उपसमितीमध्ये निर्णय होणार आहेत.

सोलापूर विद्यापीठास राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची प्रक्रिया पूर्णत्वास

सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर नाव देण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत आली असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब होऊन निर्णय होणार आहे. त्यानंतर लवकरच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज व राज्यातील मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे हे सोलापूर येथे जाऊन विद्यापीठाचे नामकरण करणार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.
धनगर समाजाच्या आंदोलनात सहभागींवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणार धनगर समाजाच्या आंदोलनात सहभागींवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणार Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 02, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.