Seo Services
Seo Services

संभाजी बाळासाहेब बारणे यांचे नाव लवकरच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झळकणार




चिंचवड : थेरगावमधील सामाजिक कार्यकर्ते व भाजपा नेते संभाजी बारणे यांनी आपल्या अनोख्या छंदातून व्हिजिटिंग कार्डचा संग्रह केला आहे. हे व्हिजिटिंग कार्ड दुसऱ्या तिसऱ्या कोणाचे नसून नगरसेवकांचे व्हिजिटिंग कार्ड आहेत तसेच या विजिटिंग कार्डबरोबरच नगरसेवकांना निवडून आल्याचे प्रमाणपत्र, पदके, सर्टीफिकीट, असे दस्तऐवज बारणे यांनी संग्रहित केले आहे. 

1970 साली पिंपरी चिंचवड नगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून ते आजपर्यंत असलेल्या महानगर पालिकेतील 2017 ते 2022 या वर्षापर्यंत असलेले नगरसेवक यांचे हे व्हिजिटिंग कार्ड संग्रहित केलेले आहे .संभाजी बारणे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागील झालेल्या निवडणुकीत अवघ्या तीनशे मतांनी पराभूत झाले. परंतु, त्यांनी आपल्या सामाजिक कामात याचा कोणताही परिणाम होऊ दिला नाही. मागील सात वर्षांपासून संभाजी बारणे हे संग्रह करीत आले आहेत. हे व्हिजिटिंग कार्ड संग्रहित करण्याचा छंद त्यांना सात वर्षांपूर्वी जडला. त्यांच्याकडे काही व्हिजिटिंग कार्ड जमा होते, त्यांनी असा विचार केला की, या विजिटिंग कार्डचे आपल्याला काही करता येईल का? जे काही असे आगळेवेगळे उपक्रम होईल, त्यानुसार त्यांनी विजिटिंग कार्ड संकलन करण्याचे काम हाती घेतले व मनात असा विचार केला की, पिंपरी चिंचवड नगरपालिकेपासून तर आत्तापर्यंतचे जेवढे नगरसेवक निवडून आले तेवढ्या सर्व नगरसेवकांचे विजिटिंग कार्ड आपण संकलित करायचे संग्रहित करायचे, या सात वर्षात त्यांना हे व्हिजिटिंग कार्ड संकलित करण्यासाठी किती त्रास झाला, किती वेगवेगळे अनुभव आले, किती मेहनत घ्यावी लागली हे त्यांच्याशी केलेल्या संभाषणातून कळते.

1970 पासूनचे सर्व नगरसेवक यांचा शोध घेणे, त्यांच्या घरांचा शोध घेणे, त्यांची फाईल, त्यांचे कागदपत्रे, त्यांचे दस्तावेज, सर्व काही शोधून काढणे, त्यांना त्यासाठी बरीच मेहनत करावी लागली आहे. या संकलन कामाकरिता त्यांना एका घरी दहा ते बारा वेळा चकरा माराव्या लागल्या आहेत, यावरूनच असे आपल्याला समजते की 1970 पासून आतापर्यंत बाराशे ते तेराशेजणांचे व्हिजिटिंग कार्ड संकलन करताना त्यांना किती त्रास झाला असेल, त्यांचा हा छंद जोपासताना त्यांनी या विजिटिंग कार्डचा संग्रह आतापर्यंतचा पूर्ण केला आहे आणि आता नुकतेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडे या दस्तऐवजाची नोंद करणार आहेत. संभाजी बारणे यांचे असे म्हणणे आहे की, आजतागायत अशा व्हिजिटिंग कार्डचे संकलन कोणीही केलेले नाही किंवा असे आतापर्यंत संकलन केल्याचे पाहण्यात किंवा ऐकण्यात आले नाही.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या त्यांच्या उपक्रमाची नोंद झाल्यास ते एकमेव असे व्यक्ती असतील, ज्यांनी हा एकमेव उपक्रम राबविला व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद झाली पाहिजे. तसेच हा छंद जो त्यांनी आत्मसात केला आहे विजिटिंग कार्ड संकलित करण्याचा तो इथेच थांबणार नसून यापुढेही ते हे उपक्रम असेच पुढे चालविणार असल्याची माहिती संभाजी बारणे यांनी  दिली.
संभाजी बाळासाहेब बारणे यांचे नाव लवकरच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झळकणार संभाजी बाळासाहेब बारणे यांचे नाव लवकरच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झळकणार Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 02, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.