मुंबई : पोस्टाच्या सेवेबद्धलच्या तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई द्वारे दिनांक 27/03/2019 रोजी 11.00 वाजल्यापासून मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई यांच्या कार्यालयामध्ये 108 वी डाक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.
डाक अदालतमध्ये डाक विभागाचे अधिकारी तक्रार सोडविण्याचा प्रयत्न करतात.महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्धल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवडयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तु/ मनी ऑर्डर/बचत बँक खाते /प्रमाणपत्र इत्चादि बाबतच्या, तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीला सह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवीली असेल त्याचे नांव व हु¬ददा इत्यादी.
संबंधितांनी डाक सेवे बाबतची आपली तक्रार श्री आर. एन. चेटुले, सहायक निदेशक डाकसेवा (ज.शि.) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, मुंबई जी. पी. ओ. इमारत, दुसरा माळा, मुंबई - 400 001 यांचे नावे दोन प्रती सह दिनांक 15/03/2019 पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाहीं. प्रपत्र महाराष्ट् टपाल सर्कलच्या वेबसाइट – www.maharashtrapost.gov.in वर उपलब्ध असल्याची माहिती मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
27 मार्च 2019 रोजी डाक अदालतीचे आयोजन
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
February 22, 2019
Rating:
No comments: