Seo Services
Seo Services

१७ फेब्रुवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन

Image result for जिल्हा कौशल्य विकास

पुणे :जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे-11, पुणे महानगरपालिका (समाज विकास विभाग), शिवाजीनगर, पुणे आणि एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स, महर्षि कर्वे विद्या विहार, कर्वे रोड, पुणे  यांच्या संयुक्त विद्यमाने दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत कौशल्य प्रशिक्षणद्वारे रोजगाराची उपलब्धता या घटक अंतर्गत रविवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स, महर्षि कर्वे विद्या विहार, कर्वे रोड, पुणे येथे करण्यात आलेले आहे, अशी माहिती  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक संचालक अ. उ. पवार यांनी दिली आहे. 

यासाठी पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, भोसरी, पिंपरी-चिंचवड या औद्योगिक परिसरातील एकूण – 34 उद्येाजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून एकूण - 2213 रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत.  उपरोक्त योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांचेद्वारे विविध पातळीवर प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.  त्याअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त लाभार्थी उमेदवारांना, तसेच समाजातील इतर पात्र उमेदवारांना देखील या रोजगार मेळाव्यामध्ये रोजगार प्राप्त व्हावा, या उद्देशाने संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  यास्तव किमान 10 वी, 12 वी पास एमसीव्हीसी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बीई, बीबीए, एमबीए, ड्रायव्हर्स इ. पात्रता धारण केलेल्या तसेच सदर योजनेंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी, रविवार, दि. १७ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या मेळाव्याअतंर्गत खाजगी क्षेत्रातील उपलब्ध असणा-या विविध प्रकारच्या जागांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस (Walk-in-Interview) आपल्या बायोडाटा (रिझ्युम) च्या प्रती मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून याचा  लाभ घ्यावा.  सहभाग घेणा-या सर्व उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन उद्योजकांची मागणी पाहून आपली संमती नोंदवावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे, पुणे महानगरपालिका (समाज विकास विभाग), शिवाजीनगर, पुणे आणि एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स, महर्षि कर्वे विद्या विहार, कर्वे रोड, पुणे  या तीनही कार्यालयांनी केलेले आहे, असेही  सहायक संचालक अ.उ.पवार यांनी कळविले आहे.

१७ फेब्रुवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन १७ फेब्रुवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 13, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.