नवी दिल्ली : 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग तसेच आयोगाच्या सदस्यांनी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विस्तृत चर्चा केली. या बैठकीत वन क्षेत्रावर आधारीत कर हस्तांतरण सूत्र, तसेच प्रस्तावित जलग्रहण भाग आणि वन पुनर्स्थापना अनुदान याबद्दल चर्चा करण्यात आली.
पर्यावरण (प्रदूषण विभाग) साठी प्रस्तावित शिफारशींवरही सखोल चर्चा झाली. प्रदूषण कमी करण्याच्या कामगिरीबद्दल द्यायच्या अनुदानाचाही यात समावेश होता.
एनडीसी गोल 5 अंतर्गत येणाऱ्या हवामान बदलाच्या शिफारशीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. हवामान बदल अर्थात (एनडीसी गोल 5 ग्रँट) विषयीही चर्चा करण्यात आली.
15 व्या वित्त आयोगाने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मुद्यांवर घेतली बैठक
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 21, 2019
Rating:
No comments: