नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराद्वारे फेब्रुवारी 2019 या महिन्यात एकूण 97 हजार 247 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. यापैकी 17 हजार 626 कोटी रुपये केंद्रीय वस्तू सेवा कर, 24 हजार 192 राज्य वस्तू सेवा कर, तर आंतरराष्ट्रीय वस्तू सेवा कर 46 हजार 953 कोटी रुपये आहे. आंतरराष्ट्रीय वस्तू सेवा करात आयातीवरील 21 हजार 384 कोटी रुपये आणि 8 हजार 476 कोटी रुपयांच्या सेसचा समावेश आहे.
28 फेब्रुवारी पर्यंत 73.48 लाख जीएसटी 3बी परतावे दाखल करण्यात आले.
फेब्रुवारी 2019 मध्ये दावे मिटवल्यानंतर केंद्रीय वस्तू सेवा कराद्वारे 37 हजार 95 कोटी रुपये तर राज्य वस्तू सेवा करातून 39 हजार 939 कोटी रुपये असा एकूण महसूल जमा झाला आहे. फेब्रुवारी 2018 मधे हा महसूल 85 हजार 962 कोटी रुपये होता. फेब्रुवारी 2019 मध्ये या महसुलात 13.12 टक्के वाढ झाली आहे.
वस्तू आणि सेवा कराद्वारे फेब्रुवारी महिन्यात एकूण 97 हजार 247 कोटी महसूल जमा
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 02, 2019
Rating:
No comments: