Seo Services
Seo Services

सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने खडीगंमत महोत्सवाचे आयोजन


मुंबई, दि. 14 : पारंपरिक लोककलांचा प्रचार व प्रसार अधिकाधिक होऊन लोककलांचे जतन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने खडीगंमत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १४ ते २० मार्चदरम्यान  हार्दिक सभागृह, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने दरवर्षी विविध पारंपरिक लोककला महोत्सवाचे आयोजन केले जाते. या खडीगंमत महोत्सवात विदर्भातील पारंपरिक खडीगंमत लोकनाट्याचे सादरीकरण केले जाणार आहे. या सातदिवसीय महोत्सवात दररोज एक शाहिरी पथक आपली कला सादर करणार आहे.
       
या महोत्सवात नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील शाहीर यादवराव खानोलकर,भंडारा जिल्ह्यातील शाहीर उत्तम आशीर्वाद, नागपूरचे शाहीर राजकुमार गायकवाडनागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथील शाहीर बाळाभाऊ बावणे,नागपूर जिल्ह्यातील शाहीर निनाद बाशेड, नागपूर जिल्ह्यातील नानाभाऊ तायवाडे, चंद्रपूरमधील शाहीर सुरमाताई बारसागडे आदी कलाकार मनोरंजनातून समाजप्रबोधन करणारे कार्यक्रम सादर करणार आहेत. सर्व लोककलावंत आणि रसिकांनी या महोत्सवात सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने खडीगंमत महोत्सवाचे आयोजन सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने खडीगंमत महोत्सवाचे आयोजन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 14, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.