Seo Services
Seo Services

निवडणूक खर्चासंदर्भात राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाची नोटीस



Image result for राज्य निवडणूक आयोग

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केलेल्या खर्चाचा तपशील सादर न केल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने मान्यताप्राप्त 14 राजकीय पक्षांना नोटीस बजावल्या असून 10 मार्च 2019 पर्यंत खर्चाचा तपशील सादर करावा, असे कळविण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाच्या 15 ऑक्टोबर 2016 च्या आदेशान्वये राजकीय पक्षांना निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासंदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून राजकीय पक्षांना वेळोवेळी अवगतही करण्यात आले होते. त्यामुळे आपली नोंदणी रद्द का करण्यात येऊ नये, अशी नोटीस आता बजावण्यात आली आहे.

नोटीस बजावण्यात आलेल्या राजकीय पक्षांनी नावे अशी : भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पार्टी, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), बहुजन समाज पार्टी,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,  शिवसेना,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनता दल (सेक्युलर), समाजवादी पार्टी, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम,लोकजनशक्ती पार्टी, ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन आणि जनता दल (युनायटेड).
निवडणूक खर्चासंदर्भात राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाची नोटीस निवडणूक खर्चासंदर्भात राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाची नोटीस Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 08, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.