पुणे -
पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पहिल्या टप्प्यात तर मावळ आणि शिरूर
मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे ज्या मतदारांची नावे
पुणे आणि बारामती मतदारसंघाबरोबर शिरूर अथवा मावळ मतदारसंघामध्ये अशा दुबार
मतदारांकडून दोनदा मतदान होण्याची शक्यता आहे. दुबार मतदान रोखण्यासाठी जिल्हा
प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात येत असून दुबार मतदारांची मतदान केंद्रनिहाय
तसेच विधानसभा मतदारसंघ निहाय यादी तयार करण्यात आली आहे. ज्या मतदारांची नावे
दुबार मतदारयादीमध्ये आहे, अशा मतदारांकडून दोन ओळखपत्रे मागविली जाणार आहेत. तसेच, त्यांच्या
अंगठ्यांचासुध्दा ठसा घेतला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
यंदा
प्रथमच जिल्ह्यात लोकसभेच्या चार मतदारसंघासाठी दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत.
या मतदानाच्या दिवसांमध्ये सहा दिवसांचे अंतर आहे. पुणे आणि बारामती मतदारसंघासाठी
दि. 23
एप्रिलला तर मावळ आणि शिरूर मतदारसंघासाठी दि. 29 एप्रिलला मतदान होणार आहे. जिल्ह्यात मयत, दुबार आणि
स्थलांतरीत अशी एकूण 3 लाख 40 हजार मतदारांची नावे मतदारयादीत आहेत. त्यामुळे पुणे आणि बारामती
मतदारसंघात नाव असण्याबरोबरच मावळ अथवा शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदार यादीत नाव
असल्यास या दुबार मतदारांकडून या ठिकाणी मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही बाब लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. मतदान केंद्रनिहाय
तसेच विधानसभा मतदारसंघ निहाय दुबार मतदारांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी
प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध असणार आहे. दुबार नाव असलेली व्यक्ती प्रत्यक्ष
मतदानासाठी आल्यावर त्यांच्याकडे दोन ओळखपत्राची मागणी करून ती तपासली जाणार आहे.
तसेच, मतदान
नोंद वहीवर सहीबरोबरच त्या व्यक्तींचा अंगठ्याचा ठसाही घेतला जाणार आहे.
मतदान
झाल्यावर ही यादी लिफाफ्यात ठेवली जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने दुबार मतदान
केल्याचे आढळल्यास त्या मतदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राम
यांनी सांगितले.
118 संवेदनशील मतदान केंद्रे
पुणे
लोकसभा मतदारसंघात 118 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. ज्या मतदान केंद्राच्या मतदार
यादीमध्ये मतदारांचे फोटो असण्याचे प्रमाण कमी आहे. दुबार मतदारांची संख्या आणि
बोगस मतदान झाले आहे अथवा मतदार यादीमध्ये कुटुंब जोडणी होण्याचे प्रमाण कमी आहे, अशी मतदान केंद्रे
प्रामुख्याने संवेदनशील मतदान केंद्रे म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात
आली आहेत. या संवेदनशील मतदान केंद्रावरील मतदानाचे थेट प्रक्षेपण निवडणूक
आयोगाच्या संकेतस्थळावर केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राम यांनी दिली.
दुबार मतदान रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष दक्षता
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 29, 2019
Rating:
No comments: