Seo Services
Seo Services

निवृत्त पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर राज्याच्या उप लोकायुक्तपदी



मुंबई : राज्याचे उपलोकायुक्त म्हणून निवृत्त पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांनी आज शपथ घेतली. मुख्य सचिव डी. के. जैन यांनी श्री. पडसलगीकर यांना पदग्रहणतेची शपथ दिली.

सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रारंभी राज्यपालांच्या अधिपत्राचे वाचन केले. याप्रसंगी आमदार ॲड. आशिष शेलार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी, महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे (महारेरा) अध्यक्ष गौतम चटर्जी, उप लोकायुक्त शैलेश कुमार शर्मा, कोकण विभागाचे राज्य माहिती आयुक्त सुनील पोरवाल, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल, वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड आदींसह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते.
निवृत्त पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर राज्याच्या उप लोकायुक्तपदी निवृत्त पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर राज्याच्या उप लोकायुक्तपदी Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 08, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.