पुणे : भारतीय निवडणूक आयोग व
राज्य निवडणूक आयोगयांच्या मार्गदर्शनानुसार पुणे जिल्ह्यात सिस्टेमॅटीक वोटर्स एज्युकेशन अॅण्ड इलेक्टोरल
पार्टीसिपेशन (स्वीप) या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत मतदार वर्गांना जागृत, प्रशिक्षित करून भारतीय लोकशाही मजबूत करणे आणि प्रत्येक
नागरिकानेभारतीय लोकशाहीचा मुख्य घटक म्हणून आपला मतदानाचा मुलभूत अधिकार बजावणे
हे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मतदार जागृती व शिक्षण कार्यक्रम फार महत्त्वाचा
घटक ठरला आहे.
मतदान प्रक्रियेत मुख्यत्वे दोन महत्त्वाचे
घटक-
१) मतदान केंद्राची सुसज्ज
व्यवस्था व सुलभ मतदान करण्याची व्यवस्था तयार करणे
२) मतदारांना जागृत करून
मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर मतदान करण्यास आवाहन करणे आणि त्यासाठी नावीन्यपूर्ण
जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करणे.
आजपर्यंत जाणीव – जागृती कार्यक्रमात स्वयंसेवी संस्थाद्वारे
मुख्यत्वे पथनाट्य, चित्रकला स्पर्धा, शपथ समारोह, प्रभात फेरी इत्यादी
पारंपरिक पद्धतीचा वापर केला जात आहे. परंतु सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या
तयारीसाठी स्वीपमध्ये विशेषता
नावीन्यपूर्ण कल्पना संकल्पना आणि मतदान मतदार जागृतीची शासन यंत्रणा उभी
करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नवीन संकल्पना सांगितल्या आहेत.
भारत निवडणूक आयोग नवीन संकल्पना-
१) चुनाव पाठशाळा
2) महाविद्यालय स्तरावर मतदार जागृती मंडळाची स्थापना, प्रशिक्षण कामे व जबाबदारी
३) माध्यमिक शाळा व कनिष्ठ
महाविद्यालय स्तरावर भविष्यातील मतदारांसाठी मतदान मतदार जागृती मंडळाची स्थापना व
प्रशिक्षण
४) मतदार जागृती मंचाची
स्थापना
सर्व शासकीय राज्य शासकीय आणि केंद्र शासकीय
कार्यालय, निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालय, सहकारी संस्था कार्यालय, सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांची कार्यालये, कारखाने, सर्व खासगी व्यवस्थापनाची
कार्यालय आणि स्वयंसेवी संस्थांची कार्यालय याठिकाणी मतदार जागृती मंचाची स्थापना
करून जाणीव जागृती उपक्रम, चर्चासत्र, स्पर्धा, दृकश्राव्य साधनांद्वारे
जागृती आणि सर्व कर्मचाऱ्यांची मतदान नोंदणी करणे हे या समितीचे मुख्य कार्य आहे.
५) दिव्यांग मतदार जागृती
कार्यक्रमाचे आयोजन- या लोकसभा निवडणुकांचे ब्रीदवाक्यच ‘सुलभ निवडणुका’ हे आहे. यात कोणत्याही प्रकारचा मतदार निवडणूक प्रक्रियेपासून दूर
राहता कामा नये. दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक, शारीरिकदृष्टया दुर्बल व्यक्ती यांना प्रवृत्त
करून त्यांच्यासाठी मतदार नोंदणी करण्यास मदत करणे. त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी - येण्यासाठी सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करणे इत्यादी महत्त्वाच्या
जबाबदाऱ्या दिव्यांग जनजागृती कार्यक्रमांमध्ये निश्चीत करण्यात आल्या आहेत.
६) महाविद्यालयातील कॅम्पस
अँम्बेसिडरचा मतदार जनजागृतीमध्ये
सहभाग- महाविद्यालय स्तरावर
सहभाग वाढवण्यासाठी आणि त्याचबरोबर तरुणांना प्रोत्साहित करून स्थानिक
समुदायांमध्ये जसे ग्रामस्थ, वस्ती- वाड्यांवर जनजागृतीच्या मोहिमांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे.
मतदार जाणीव जागृती व शिक्षण यामध्ये स्वयंसेवी
संस्थांचे पदाधिकारी काय
उपक्रमराबवू शकतात-
१) सर्व गृहनिर्माण संस्था, सहकारी संस्था, पतसंस्था सहकारी संस्था इत्यादी ठिकाणी जाऊन मतदारांसाठी शपथ समारंभाचे आयोजन, पथनाट्य, चर्चासत्र, दृक-श्राव्य साधनांद्वारे भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या
चित्रफिती, क्लिप्स, व्हिडीओ क्लिप्स, संदेश, चित्रसंदेश मतदारापर्यंत पोहोचविणे, स्पर्धांचे आयोजन करणे,विशेषत: महिला मतदार आणि युवक - युवती मतदारांचे मेळावे, चर्चासत्र आयोजित करणे, सोशल मीडियाचा उपयोग करून
आदर्श आचारसंहितेचे पालन करत मतदारापर्यंत मतदान जागृती संदेश पोहोचवणे.
२) शाळा आणि महाविद्यालय, माध्यमिक कनिष्ठ, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय इत्यादी स्तरावर स्थापन
झालेला मतदार जागृती क्लबने पथनाट्य बसवून
महाविद्यालयात आणि महाविद्यालयाबाहेरील समुदायामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये
वाड्या - वस्त्यांमध्ये त्या
कार्यक्रमाचे आयोजन करणे.
३) ग्रामस्तरावर चुनाव
पाठशाळा – ग्रामस्तरावर चुनाव पाठशाळा सदस्यांना सक्रिय करून त्यांना
मतदार जागृती प्रशिक्षण देणे आणि संबंधित मतदान केंद्र
अधिकारी म्हणजे बीएलओ यांच्याशी संपर्क करून ग्रामीण जनतेला जागृत
करण्याचे कार्य विविध उपक्रमांद्वारे करणे.
४) खाजगी संस्था, कंपन्या यांच्या मदतीने त्यांच्या कर्मचाऱ्यांची जागृती
होण्यास सहाय्य करणे.
मतदार जागृती मध्ये लक्षात घ्यावयाच्या विशेष
बाबी-
१) आपल्या मतदान केंद्रावरील बीएलओ त्यांच्याशी सतत संपर्कात
राहून त्यांना मतदार जागृती कार्यक्रम व मतदान नोंदणी अभियानात सक्रिय मदत करणे.
२) मतदारांना वेगवेगळ्या
माध्यमातून मतदार नोंदणीची, मतदान करण्यासाठीची जागृती केली पाहिजे, असे पोस्टर, बॅनर, होर्डिंग याशिवायसोशल मीडिया म्हणजेच समाजमाध्यमे, रेडिओ, कम्युनिटी, रेडिओ इत्यादी माध्यमांद्वारे मतदार जागृतीचे संदेश
पोहोचविणे.
३) मतदार ओळखपत्र - प्रत्येक मतदारांना मतदार ओळखपत्र बीएलओ द्वारा घेण्यासाठी मदत करणे आणि सहाय्य करणे.
४) मतदार सहायक केंद्राद्वारे मतदारांना आपले नाव तपासून पाहण्याची सोय उपलब्ध
करून देणे, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीयांच्या पोर्टलवरून मतदारांचे नाव
यादीत आहे की नाही याविषयी त्यांना
माहिती करून देणे.
५) नैतिक मतदानाची माहिती - मतदारांना नैतिक मतदानाची माहिती व जागृती
करून देणे, भारतीय लोकशाहीत
नागरिकांचे कर्तव्य आणि मतदानाची पावित्र्य राखण्यासाठी विविध माध्यमांद्वारे
नैतिक मतदानाचे महत्त्वपटवून देणे, विशेषत: चर्चासत्रे, वक्तृत्वस्पर्धा, रॅली, मानवी साखळी व शपथपत्र
इत्यादी माध्यमांचा नैतिक मतदानासाठीचा उपयोग करता येतो.
६) मतदान केंद्राची माहिती
सामान्य जनतेला पोहोचणे, मतदान केंद्रासंबंधी
सहाय्य करणे.
७) आदर्श मतदान केंद्र
उभारण्यासाठी विशेष मदत व सहाय्य करणे - लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मतदान प्रक्रिया लोकशाही उत्सव म्हणून
साजरा करणे आणि प्रत्येक मतदारांना
मतदान करण्यासाठी आणि मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सहाय्य
करणे,
आदर्श मतदान केंद्रासाठी नावीन्यपूर्णखालील
बाबींचा उपयोग करता येईल. १) पहिल्या शंभर मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करणे २) मतदान केंद्रावर रांगोळी काढणे आणि मतदान केंद्र सुशोभित
करणे ३) मतदान केंद्रावर सनई चौघडे वाजविणे ४) दिव्यांग मतदारांना
व्हीलचेअर आहे की नाही याची चौकशी करून ते उपलब्ध करून देणे ५) ज्येष्ठ नागरिकांना मतदान
केंद्रापर्यंत जाण्यासाठी सहाय्य करणे, पिण्याच्या पाण्याची
व्यवस्था करणे इत्यादी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या परिसरातील मतदान केंद्र आदर्श
करण्याचा प्रयत्न करणे, जसे आपण समारंभासाठी
जय्यत तयारी करतो तसे मतदान केंद्र साठी आणि मतदानासाठी तयारी करणे.
८) इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन (इव्हीएम) व्होटर
व्हेरिफीएबल पेपर ऑडीट ट्रेल (व्हीव्हीपॅट) बाबत जागृती - व्हीव्हीपॅट ही नवीन प्रणाली असून मतदारांना डेमो देऊन तज्ञ अधिकाऱ्यांना आमंत्रित करून व्हीव्हीपॅट जाणीव जागृती
कार्यक्रमाचे आयोजन करणे. या प्रणालीमुळे आपण मतदान
कोणाला केले हे दिसते आणि पारदर्शकता निर्माण होते.
पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा
निवडणूक अधिकारी नवल किशोर राम, उप जिल्हा निवडणूक
अधिकारी मोनिका सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे सुभाष बोरकर,आशाराणी पाटील, यशवंत मानखेडकर हे विविध
स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने मतदार जागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवत
आहेत. अशी माहिती राजेंद्र सरग जिल्हा माहिती अधिकारी पुणे यांनी दिली.
मतदार जागृती व शिक्षण कार्यक्रम (स्वीप)
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 15, 2019
Rating:
No comments: