Seo Services
Seo Services

नविन मार्गांवर तेजस्विनी बस मागणीनुसार जादा सुरू करनार



पुणे : महिला प्रवाशांचा मिळालेला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन पीएमपीएमएल प्रशासनाकडून “तेजस्विनी’ बसेसची सेवा आणखी काही नवीन मार्गांवर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच मार्गांचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार असून हे मार्ग लवकर सुरू करण्यात येणार आहे.

महिलांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी गत महिला दिनाचे औचित्य साधून बारा मार्गांवर “तेजस्विनी’ सेवा सुरू केली होती. महिलांची सर्वाधिक गर्दी असणारे शहर आणि उपनगरांमध्ये आणखी पंधरा ते वीस मार्ग आहेत. शिवाय अन्य मार्गावरही अशी सेवा सुरू करण्याची मागणी होत असून त्यासंदर्भात प्रशासनाला सह्यांचे लेखी निवेदनही देण्यात आले आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांनी दिली.
नविन मार्गांवर तेजस्विनी बस मागणीनुसार जादा सुरू करनार नविन मार्गांवर तेजस्विनी बस मागणीनुसार जादा  सुरू करनार Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 13, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.