Seo Services
Seo Services

पोलिसांनो सावधान! भर दिवसा लूटताहेत तोतया पोलीस ज्येष्ठ नागरिकाला




पिंपरी : मी पोलीस आहे. मला तुमची बॅग तपासायची आहे.’ असे म्हणून ज्येष्ठ नागरिकाची बॅग तपासत असताना त्याने हातचलाखी करून चार हजार रूपये काढून घेतले. हा प्रकार रविवारी (दि. १७) दुपारी दोनच्या सुमारास प्रचंड गर्दीच्या शगुन चौक पिंपरी येथे घडला. सुधाकर पुंडलिक अकोले ७९ रा. चिखली यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक निमगिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधाकर हे सेवानिवृत्ती शासकीय नोकर आहेत. ते रविवारी दुपारी खरेदीसाठी पिंपरी मधील शगुन चौकात आले होते. खरेदी सुरु असताना अचानक अंदाजे ५० वय असलेला एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला आणि त्यांना म्हणाला ‘मी पोलीस आहे. मला तुमच्या खिशात गुटखा आहे का, ते चेक करायचे आहे.’ त्यावरून सुधाकर यांनी त्यांचे खिसे दाखवले.

त्यावेळी त्यांच्या खिशात चार हजार रुपये होते. ते सर्व पैसे आरोपीने स्वतःच्या हातात घेतले. त्यानंतर सुधाकर यांना बॅग दाखवण्यास सांगितले. हातातील पैसे बॅगमध्ये ठेवतो असे सांगून हातचलाखी करून सर्व पैसे आरोपीने लुटून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
पोलिसांनो सावधान! भर दिवसा लूटताहेत तोतया पोलीस ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांनो सावधान! भर दिवसा लूटताहेत तोतया पोलीस ज्येष्ठ नागरिकाला Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 18, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.