मतदाराचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहाण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर एक स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. वेबसाईटवर आपण आपले नाव, मतदान केंद्राची माहिती मिळवू शकतो. आपले नाव पाहाण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकचा वापर करू शकता Chief Electoral Officer, Maharashtra यांचा नावाने तुम्हाला एक वेब पेज दिसेल
खाली दिलेल्या माहितीचा उपयोग करा .
वरील बटणावर क्लिक केल्यानंतर आपण इलेक्शन कमिशनच्या साईटवर जाल.
साईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर Name Wise आणि ID Card Wise हे दोन पर्याय उपलब्ध असतील.
त्यातील Name Wise पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे District आणि Assembly असे दोन पर्याय समोर येतील. त्यापैकी Assembly हा पर्याय निवडल्यास तुम्हाला पुढे चार पर्याय पुढे येतील. ते सर्व पर्याय तुम्हाला भरावे लागतील.
त्यामध्ये पहिला पर्याय असेल तो Select District. त्या पर्यायात तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
त्या पुढचा पर्याय Select Assembly. म्हणजेच तुमचा मतदारसंघ. त्या पर्यायापुढे तुमच्या मतदारसंघांचे नाव निवडा.
त्यानंतर तुमचे नाव टाका.
त्यानंतर तुमचे आडनाव टाका.
त्यानंतर तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाका.
हे सर्व रखाने भरल्यानंतर Search या पर्यायवर क्लिक करा.
ही प्रक्रिया पूर्ण करताच तुमचे नाव, तुमचा मतदार क्रमांक, वय याबाबतची माहिती समोर येईल. याशिवाय तुम्हाला तुमचं मतदान केंद्र पाहायचे असल्यास त्या पर्यायातील Polling Station Address यावर क्लिक करा. त्यांनंतर तुम्हाला तुमच्या मतदार केंद्रांची माहिती उपलब्ध होईल.
याशिवाय तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचे नावही पाहाता येणार आहे.
मतदार नोंदणी झालेली नसल्यास मतदार नोदणीसाठी नवीन अर्ज दाखल करणे गरजेचे आहे त्यामुळे यादी मध्ये तुमचे नाव नसल्यास तुमचा मतदार यादी मध्ये नाव सामाविस्ट करण्यासाठी नवीन अर्ज दाखल करा .
मतदाराचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहाण्यासाठी, खाली दिलेल्या माहितीचा उपयोग करा
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 29, 2019
Rating:
No comments: