जागतिक आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी सर्वांसमवेत काम करायला भारत तत्पर
नवी दिल्ली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी क्रोएशिआमधे भारतीय समुदायाला संबोधित केले. जागतिक आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी भारत प्रत्येकासमवेत काम करण्यासाठी तत्पर आहे, तसेच प्रत्येकाबरोबर मैत्रीचा हात पुढे करायला तयार असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.
क्रोएशिआमधे भारतीय समुदायाचे स्वागत झाले, असे सांगून क्रोएशिआच्या विकासात हे भारतीय योगदान देत आहेत. मात्र या भारतीयांनी आपल्या हृदयात भारतीय मूल्ये आणि परंपरा जागती ठेवली असे प्रशंसोद्गार राष्ट्रपतींनी यावेळी काढले.
इथल्या भारतीयांवरुन, क्रोएशिएन जनता, भारत जाणू शकते. इथल्या भारतीयांनी, भारताची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यात मोलाचे योगदान दिल्याचे राष्ट्रपती म्हणाले. क्रोएशिआ मधल्या जनतेने, भारतीयांना आपल्या सामाजिक जीवनात सामावून घेतल्याबद्दल इथल्या मैत्रीपूर्ण जनतेचे त्यांनी आभार मानले.
सांस्कृतिक संस्था, नृत्य, योग, आयुर्वेद उपचार, भारतीय रेस्टॉरंट यांचे विशाल जाळे निर्माण करण्यासाठी इथल्या भारतीय समुदायाने केलेल्या प्रयत्नांची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली.
क्रोएशिआच्या राष्ट्राध्यक्ष कोलिंदा ग्रबर-कित्रोव्हिक यांनी राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या भोजन समारंभालाही राष्ट्रपती उपस्थित होते.
राष्ट्रपतींनी क्रोएशिआमधे भारतीय समुदायाला केले संबोधित,
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 28, 2019
Rating:
No comments: