नवी दिल्ली : ‘स्वच्छ सर्वेक्षण -2019’ मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तर स्वच्छ सर्वेक्षणात ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’चा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत पुरस्काराचे प्रदान करण्यात आले.
येथील विज्ञान भवनात एका शानदार समारंभात ‘स्वच्छ सर्वेक्षण-2019’ चे निकाल घोषित करण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोत्तम 10 पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राला सर्वोत्तम (बेस्ट परफॉर्मिंग स्टेट) राज्याचा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत अभियानाच्या कार्यकारी संचालक सीमा ढमढेरे, राज्य अभियान संचालक जयंत दांडेगावकर व सुधाकर बोबडे यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला. या कार्यक्रमास केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, केंद्रीय शहरी विकास विभागाचे सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा उपस्थित होते.
राज्यातील 27 शहरांना कचरा मुक्त शहरांसाठी ‘थ्री स्टार’ दर्जा
स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 27 शहरे कचरामुक्त ठरली आहेत. यामध्ये मूल,वैजापूर, वसई विरार, मिरा-भाईंदर, नवीमुंबई, खोपोली, जुन्नर, लोणावळा,सासवड, भोर, इंदापूर, संगमनेर, परळी, पंढरपूर, मंगळवेढा, महाबळेश्वर,पाचगणी, कराड, रत्नागिरी, मलकापूर, पन्हाळा, वडगाव, कोल्हापूर, गडहिंग्लज,विटा, तासगाव, कोरेगाव या शहरांचा समावेश आहे. कचरामुक्तीसाठी या शहरांना ‘थ्री स्टार’ दर्जा देण्यात आला आहे. या सर्व शहरांना केंद्रीय शहर विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कराड शहराला स्वच्छ शहराचा पुरस्कार
स्वच्छ सर्वेक्षणातील पश्चिम विभागात एकूण 19 पुरस्कार देण्यात आले. यापैकी 13पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. यामध्ये कराड, लोणावळा, मूल, उरण-इस्लामपूर, उमरेड, अंबाजोगाई, खोपोली, विटा, देवळाली-प्रवरा, इंदापूर, पोंभूर्णा, मौदा सीटी या शहरांचा समावेश आहे. एक लाख लोकसंख्या असलेल्याशहरामधून सातारा जिल्ह्यातील कराड, पुणे जिल्ह्यातील लोणावळा व चंद्रपूरजिल्ह्यातील मूल या शहरांना स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे. 50 हजार ते1 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील उरण-इस्लामपूर, उमरेड, अंबाजोगाई व खोपोली या शहरांना स्वच्छ शहरांचा पुरस्कारमिळाला आहे. 25 ते 50 हजार लोकसंख्या असलेल्या विटा, देवळाली-प्रवरा वइंदापूर या शहरांनाही स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे तर 25 हजारापेक्षाकमी लोकसंख्या असलेल्या पोंभूर्णा, मौदा, मलकापूर या शहरांनाही पश्चिमविभागतून स्वच्छ शहरांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नागरिक प्रतिसादामध्ये नवी मुंबईला पुरस्कार
10 लाखा पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील शहरांमध्ये नवी मुंबईशहराला स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांच्या उत्तम प्रतिसादाबद्दल पुरस्कृत करण्यात आले. 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमधून नागरिक प्रतिसादासाठीचंद्रपूर शहराला गौरविण्यात आले. तर घनकचरा व्यवस्थापनात केलेल्याउल्लेखनीय कार्यायाठी लातूर शहराला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देण्यात आला.
पन्हाळा स्वच्छ सर्वेक्षणात देशात 17 व्या स्थानी
स्वच्छ सर्वेक्षणात नवसंकल्पनांचा प्रभावी वापर केल्याबद्दल राजधानी शहरांसाठीअसलेला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार बृन्हमुंबई शहराला देण्यात आला. कोल्हापूरजिल्ह्यातील पन्हाळा या शहराला देशातील 1 लाख लोकसंख्या असलेल्याशहरांच्या क्रमवारीत 17 वा क्रमांक मिळाला आहे. देशातील पाच शहरांना हापुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये राजकोट, भिलाई नगर, विजयवाडा वगाजियाबाद या शहरांचा समावेश आहे. अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डास उत्तमस्वच्छ कॅन्टोन्मेंट पुरस्कार देण्यात आला आहे.
स्वच्छ रँकिंगमध्ये पहिल्या शंभरात राज्यातील 24 शहरे
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने देशातील 423 शहरांची रँकिंगजाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या 100 शहरांत महाराष्ट्रातील 24 शहरांचासमावेश आहे. या शहरामध्ये नवी मुंबई (7), कोल्हापूर (16), मीरा-भाईंदर (27),चंद्रपूर (29), वर्धा (34), वसई-विरार (36), पुणे (37), लातूर (38), सातारा (45),पिंपरी-चिंचवड(52), उदगीर (53), सेालापूर (54), बार्शी (55), ठाणे (57), नागपूर(58), नांदेड-वाघाळा (60), नाशिक (67), अमरावती (74), जळगाव (76),कल्याण-डोबिंवली (77), पनवेल (86), अचलपूर (89),बीड (94) व यवतमाळ(96) या शहरांचा समावेश आहे.
घनकचरा व्यवस्थापनात राज्यातील चार शहरे
घनकचरा व्यवस्थापनासाठी महाराष्ट्रातील चार शहरांना स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारदेऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये लातूर, खोपोली, इंदापूर व मलकापूर याशहरांचा समावेश आहे. स्वच्छतेबाबत नागरिकांचा प्रतिसाद मिळविण्यात प्रभावीकार्य केल्याबद्दल महाराष्ट्रातील नवी मुंबई, चंद्रपूर, उमरेड व पोंभुर्णा या शहरांनास्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘स्वच्छ सर्वेक्षण’ मध्ये सर्वाधिक ४५ पुरस्कार पटकावून महाराष्ट्र देशात अव्वल
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 06, 2019
Rating:
No comments: