Seo Services
Seo Services

मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळ प्रक्रिया पूर्ण


वाशिम : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध ठिकाणाहून जिल्ह्याला प्राप्त झालेल्या बॅलेट युनिटकंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया (फर्स्ट रॅण्डमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्ण झाली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सरमिसळ प्रक्रियेनंतर वाशिम येथील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्रांचे विधानसभा मतदारसंघनिहाय वितरण करण्यात आले. 

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजनमहसूलचे उपजिल्हाधिकारी तथा मतदान यंत्र व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी अधिकारी रमेश काळेजिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदारनायब तहसीलदार प्रकाश डाहोरेवाशिम तहसील कार्यालयाचे निवडणूक नायब तहसीलदार दीपक दंडे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्राच्या संख्येपेक्षा वीस टक्के जादा मतदान यंत्रे संबंधित मतदार संघांच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वितरीत करण्यात आली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील सरमिसळ प्रक्रिया लोकसभा मतदारसंघस्तरावर होणार आहे. 

वितरीत मतदान यंत्रांचा तपशील

मतदारसंघ
बॅलेट युनिट
कंट्रोल युनिट
व्हीव्हीपॅट
३३-रिसोड
३९७
३९७
४२९
३४- वाशिम
४४६
४४६
४८२
३५- कारंजा
४२२
४२२
४५६
एकूण
१२६५
१२६५
१३६७
मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळ प्रक्रिया पूर्ण मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळ प्रक्रिया पूर्ण Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 26, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.