नवी दिल्ली : ‘नागरी भागांना लक्ष्य करू नये’ या पाकिस्तानी सैन्याला आम्ही दिलेल्या इशाऱ्यानंतर नियंत्रण रेषेवरील एकंदर परिस्थिती तुलनेने शांत राहिली आहे. गेल्या 24 तासात पाकिस्तानी सैन्याने उच्च क्षमतेच्या शस्त्रास्त्रांनी कृष्णा घाटी आणि सुंदरबनी भागात निष्कारण आणि जोरदार गोळीबार केला तसेच भारतीय ठाणे आणि नागरी भागांना लक्ष्य करत तोफा आणि छोट्या बॉम्बचा वर्षावही केला. भारतीय सैन्याने याला चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या बाजूला कोणीही मृत्युमुखी पडलेले नाही.
व्यावसायिक सैन्यदल म्हणून नियंत्रण रेषेवर नागरी दुर्घटना टाळण्यासाठी आम्ही कटीबद्ध असण्याचा आम्ही पुनरूच्चार करत आहोत. आमच्या संरक्षण दलांनी केलेली सर्व कारवाई ही दहशतवादाचा आणि दहशतवादी सुविधांच्या विरुद्ध होती. नागरी मृत्यू टाळण्यासाठी ही कारवाई नागरी भागापासून दूरवर करण्यात आली.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर आम्ही जागता पहारा देत असून पाकिस्तानच्या चिथावणीखोर कृत्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
‘नागरी भागांना लक्ष्य करू नये’ भारताने दिला पाकिस्तानला इशारा
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 06, 2019
Rating:
No comments: