Seo Services
Seo Services

फटाक्यांवर बंदी का? सुप्रीम कोर्टा




नवी दिल्ली : 
फटाक्यांवर घातलेल्या बंदीबाबत सुप्रीम कोर्टानं महत्वाची टिप्पणी केली आहे. केवळ फटाक्यांमुळंच प्रदूषण होत नाही. प्रदूषणाचे ते एकमेव कारण नाही. कारमुळेही मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. मग फक्त फटाक्यांवरच बंदी का? असा सवाल कोर्टानं उपस्थित केला. फटाक्यांमुळं होणाऱ्या प्रदूषणासंबंधी याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं ही टिप्पणी केली आहे.

कारमुळे सर्वाधिक प्रदूषण होत असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. मग फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी लोक का करतात? असा सवाल सुप्रीम कोर्टानं केला. 'फटाके तयार करताना बेरियमच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ग्रीन फटाक्यांचा फॉर्म्युला अद्याप निश्चित करायचा आहे,' अशी माहिती केंद्र सरकारने कोर्टात दिली. त्यावर फटाक्यांच्या कारखान्यातील बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांचं काय झालं, असा सवाल कोर्टानं केला.


 आणि कारमुळे होणाऱ्या प्रदूषणावर तुलनात्मक अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करावा, असा आदेश देतानाच कारमुळं सर्वाधिक प्रदूषण होत असल्याचं माहीत असताना, केवळ फटाक्यांवरच बंदीची मागणी का केली जाते? याचाही अहवाल तयार करताना विचार करण्यात यावा, असं कोर्टानं केंद्राला सांगितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ३ एप्रिलला होणार आहे.
फटाक्यांवर बंदी का? सुप्रीम कोर्टा फटाक्यांवर बंदी का? सुप्रीम कोर्टा Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 13, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.