Seo Services
Seo Services

आयटीआयमधील व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेस मंजुरी



मुंबईराज्यातील  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पीपीपी योजनेंतर्गंत संस्था व्यवस्थापन समितीच्या कोटयातील जागांवर तसेच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता  व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेस झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्याबाबत आली. राज्यातील अंदाजे 55 हजार 478 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पीपीपी योजनेंतर्गंत संस्था व्यवस्थापन समितीच्या कोटयातील जागांवर तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक सामाजिक बांधिलकीव घटनात्मक उत्तरदायित्व म्हणून व्यवसाय प्रशिक्षण शुल्काची प्रतिपुर्ती करण्याच्या दृष्टीने व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती या योजनेस प्रशिक्षण 2019-20 पासून या शैक्षणिक सत्रापासून मान्यता देण्यात आली.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील अभ्यासक्रमांच्या शासकीय तसेच पीपीपी योजनेंतर्गंत जागांसाठी व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या १४ मे २०१५ नुसार प्रशिक्षण शुल्क निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पीपीपी योजनेंतर्गंत प्रवेशासाठी उपलब्ध जागांवर व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्काची प्रतिपुर्ती अनुज्ञेय रहाणार आहे.

या योजनेंतर्गंत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाने विहित प्रशिक्षण शुल्काइतकी प्रतिपुर्ती अनुज्ञेय राहील.  तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (ईएसबीसी), खुला या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाने विहित केलेल्या प्रशिक्षण शुल्कामधून, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमांसाठी निश्चित केलेले प्रशिक्षण शुल्क वजा जाता, उर्वरीत प्रशिक्षण शुल्काच्या 80 टक्के इतक्या रकमेची प्रतिपूर्ती अनुज्ञेय राहील. तथापि, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गंत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक ७ सप्टेंबर २०१७ च्या शासन निर्णयामधील तरतूदीचे अनुषंगाने या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकत्रित उत्पन्न रूपये 2.50 लाखाच्या मर्यादेत असल्यास, अशा विद्यार्थ्यांकरीता प्रशिक्षण शुल्काच्या 80 टक्के रकमेऐवजी ऐवजी 100 टक्के इतक्या प्रतिपूर्तीची रक्कम अनुज्ञेय राहील.

सामाजिकदृष्टया मागास व आर्थिक दृष्टया दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक क्षमतेअभावी व्यावसायिक कौशल्यापासून वंचित रहाण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी सदर विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. सदर व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना प्रशिक्षण सत्र  2019-20 पासून लागू करण्यात येणार आहे. 2019-20 पासून अंदाजे 55 हजार 478 विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ होणार असून याकरीता शासनावर वार्षिक रूपये 119 कोटी 83 लाख इतका अंदाजे खर्च अपेक्षित आहे.
आयटीआयमधील व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेस मंजुरी आयटीआयमधील व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेस मंजुरी Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 09, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.