Seo Services
Seo Services

पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण ,वाकड येथे आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतीगृहाचे बांधकाम मंजूर


२०१५ पासून सतत पाठपुरवठाअनेकदा लेखी पत्र व बैठका,  विधानसभेतील अधिवेशनात अनेक आयुधाचा वापर,

पिंपरी :- आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पिंपरी-चिंचवड शहर येथे विकासाची गंगा आणण्याचा सपाटा सुरू केल्याचे दिसून येत आहे. शहराच्या विकासासाठी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी नियोजनबध्द कार्यक्रम तयार करून त्यादृष्टीने शासनासह प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार व सतत पाठपुरवठा करून या शहराचा चौफेर विकास सुरू केलेला आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिकदृष्ट्या परिपूर्ण असून  मोठया प्रमाणात शिक्षणाची सोय असताना सुध्दा शहरात वसतीगृह नसल्याचे बघुन आदिवासी  विकास विभागाच्या वतीने अनुसुचित मुलां-मुलींकरीता नविन वसतीगृह मंजूर करण्यासाठी सन २०१५ पासून शासनासह प्रशासनाकडे अनेकदा लेखी निवेदन देऊन बैठका घेण्यात आल्या.
राज्याच्या प्रत्येक अधिवेशनात विविध आयुधाचा वापर करुन शासनासह प्रशासनाचे लक्ष वेधले. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी केलेल्या अथक परिश्रमाला यश आले असून पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, वाकड पेठ क्र.४० येथे अनुसुचित जाती जमातीच्या मुला-मुलींकरीता १२५  क्षमतेचे शासकीय  वसतीगृहाचे बांधकाम मंजूर करण्यात आले.
पिंपरी- चिंचवड शहरात मोठया प्रमाणात शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. अनुसुचित जातीं जमातीच्या  मुला-मुलींकरीता या शहरात एकही शासकीय वसतीगृह नसल्यामूळे शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत होते. याची दखल लक्ष्मण भाऊ यांनी घेऊन शहरात  आदिवासी विकास विभागाच्या वतीने अनुसुचित जमातीच्या मुलां-मुलींकरीता वसतीगृह मंजूर करण्यासाठी प्रस्ताव पाठविणे आणि तो प्रस्ताव मंजूर करणेबाबत सन २०१५ ला आदिवासी विकास विभाग यांना लेखी पत्र देऊन त्याचा सतत पाठपुरवठा करणे यामुळे मंजूर झालेले वसतीगृहाचे बांधकाम या वर्षीच्या सत्रापासून पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण  येथे वाकड, पेठ क्र.४० येथे सुरू होणार असून बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे .
त्यामूळे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप चिंचवड विधानसभा राज्यमंत्री विष्णू सावरा यांचे 
पिंपरी चिंचवड शहरात अभिनंदन होत आहे.
पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण ,वाकड येथे आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतीगृहाचे बांधकाम मंजूर पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण ,वाकड येथे आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतीगृहाचे बांधकाम मंजूर Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 09, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.