पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपलिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत इयत्ता १० वी मधील गुणवंत विदयार्थ्यांच्या गुणगौरव व बक्षिस वितरण समारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सोमवार दि. ०४ मार्च २०१९ रोजी स.१०.०० वा. प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे होणार असून विदयार्थ्यांनी व पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहवे असे आवाहन महापौर राहूल जाधव यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहरातील ८० टक्कयापेक्षा अधिक गुण प्राप्त करणा-या इयत्ता १० वीच्या विदयार्थ्यांना प्रोत्साहनपर रक्कम बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.
तसेच प्रा. अरविंद नातू व प्रा.आनंद देसाई हे स्पर्धा परीक्षेची तयारी व करीयर मार्गदर्शन करणार आहेत.
तरी पिंपरी चिंचवड शहरातील विदयार्थ्यांनी या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले आहे.
यावेळी विषेश उपस्थिती आमदार महेश लांडगे, खासदार अमर साबळे तर प्रमुख उपस्थिती खासदार शिवाजीराव आळराव पाटील, श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, आमदार गौतम चाबुकस्वार, उपमहापौर सचिन चिंचवडे, सभापती स्थायी समिती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, पिं.चि.नवनगर विकास प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, विरोधी पक्षनेता दत्तात्रय साने, आयुक्त श्रावण हर्डीकर, आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
१० वी मधील गुणवंत विदयार्थ्यांच्या गुणगौरव व बक्षिस वितरण समारंभ
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 02, 2019
Rating:
No comments: