Seo Services
Seo Services

महापौर राहुलदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ; सर्व जाती-धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामुदायिक विवाह सोहळा संपन्न


पिंपरी : महापौर राहुल दादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार महेश दादा लांडगे स्पोर्ट्स फाऊंडेशन व महापौर राहुल दादा जाधव स्पोर्ट्स फाऊंडेशन, यांच्या वतीने सर्व जाती धर्मीय 55 जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा, पारंपारिक रितीरिवाजानुसार रामायण मैदान जाधववाडी चिखली, याठिकाणी नियोजनबद्ध रीतीने हजारो लोकांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात पार पडला. 

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवणारी तीव्र पाणीटंचाई, दुष्काळ या गोष्टी लक्षात घेऊन सामाजिक संवेदना जपत, महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, सर्व जाती धर्मीय 55 जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून, महाराष्ट्राच्या विविध भागातील गोरगरीब मध्यमवर्गीय लोकांचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळा प्रसंगी सर्व 55 जोडप्यांचे कन्यादान हे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे तसेच त्यांच्या पत्नी शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजाताई लांडगे, महापौर राहुल जाधव व त्यांच्या पत्नी श्री दिगंबर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष मंगलताई जाधव यांच्या हस्ते पार पडले. 

विवाह सोहळ्यातील सर्व 55 जोडप्यांना महापौर राहुल दादा जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन कडून संसारोपयोगी विविध वस्तू देण्यात आल्या, विवाह सोहळ्यातील बैठक व्यवस्था भोजनाची व्यवस्था काटेकोर नियोजन, लग्नप्रसंगी काढलेली भव्य दिव्य मिरवणूक, सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती सामाजिक जाणीव लक्षात घेऊन, हा सर्व जाती धर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा सुरक्षित शिस्तीत पार पाडण्याकरिता हजारो कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत होते. 

यावेळी महापौर राहुल जाधव व आमदार महेश लांडगे दोघेही सपत्नीक विवाह सोहळ्यास आलेल्या सर्व मान्यवरांचे व पाहुण्यांचे मनःपूर्वक स्वागत करत होते.  

भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे, श्री मंगलदास बांदल, जुन्नर विधानसभा आमदार शरद सोनवणे, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, माजी महापौर नितीन काळजे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, महापालिकेतील विविध समित्यांचे अध्यक्ष व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका याप्रसंगी उपस्थित होते.
महापौर राहुलदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ; सर्व जाती-धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न महापौर राहुलदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ; सर्व जाती-धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 16, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.