Seo Services
Seo Services

पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व बेघर व निराधार व्यक्तीचे होणार सर्वेक्षण



पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभाग, दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांचे मार्फत नेमणूक करणेत आलेल्या V-max e-Solution India Pvt. Ltd. या त्रयस्थ संस्थेमार्फत बेघर/निराधारांचे सर्वेक्षण करत आहे, जे फूटपाथवर, चौकात, उड्डाण पुलाखाली, रेल्वे स्टेशन किंवा बसस्थानक परिसरात राहतात, ज्याचे पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये कोणतेही घर नाही. जे लोक रस्त्यावर किंवा राहण्यायोग्य नसलेल्या परिस्थितीमध्ये राहतात, ज्याच्याकडे अनुकूल सुविधा नसतात. महापालिका अशा व्यक्तींना संभावित निवारा देण्यासाठी आणि मूल्यमापन करण्याच्या कारणास्तव बेघरांच्या सर्वेक्षणव्दारे सर्वसाधारण तपशील कौटुंबिक आणि सामाजिक आर्थिक परिस्थिती, आरोग्य स्थिती संदर्भात तपशील गोळा करीत आहे.

आपल्या शहरातील सर्व भागामध्ये सर्वेक्षक जाऊन बेघरांचे सर्वेक्षण दिनांक ९/३/२०१९ ते  ९/४/२०१९ या कालावधीमध्ये रात्री करण्यात येणार आहे. सर्वे बेघरांचे सर्वेक्षण होण्यामध्ये नागरिकांनी सहकार्य करावे. जर त्यांना असे निराधार किंवा बेघर व्यक्ती रस्त्यावर किंवा इतर भागात आढळल्यास त्रयस्थ संस्थेच्या Helplin ७९९७००७१६७ या क्रमांकावर संपर्क साधून सर्वेक्षणामध्ये मदत करावी. ज्यामुळे महानगरपालिका क्षेत्रात अशा बेघरांना निवारा देण्यात मदत होईल. असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व बेघर व निराधार व्यक्तीचे होणार सर्वेक्षण पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व बेघर व निराधार व्यक्तीचे होणार सर्वेक्षण Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 12, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.