Seo Services
Seo Services

राज्यातील शाळा, शासकीय इमारतीत ९० हजाराहून अधिक मतदान केंद्र


Image result for मतदान केंद्र



राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदान केंद्र

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सुमारे 95 हजाराहून अधिक असलेल्या मतदान केंद्रांपैकी सुमारे 61 हजार मतदान केंद्र ग्रामीण तर 34 हजाराहून अधिक शहरी भागात आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे हजार 600 हून अधिक मतदान केंद्र आहेत. त्यापाठोपाठ मुंबई उपनगरठाणे या जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रांची संख्या जास्त आहे. शहरी भागात मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान केंद्र असून पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील मतदान केंद्रांची संख्या जास्त आहे. राज्यात सुमारे 1300 पेक्षा जास्त मतदान केंद्र वन आणि अर्ध वन भागातील असून 90 हजार पेक्षा जास्त मतदान केंद्र शाळामहाविद्यालये आणि शासकीय इमारतींमध्ये आहे.

निवडणूक प्रक्रियेतील अविभाज्य घटक म्हणून मतदान केंद्र ओळखले जाते. मतदाराला मतदानाचा हक्क बजावण्याकरिता मतदान केंद्र महत्त्वाची भूमिका बजावतात. बहुतांश मतदान केंद्र शासकीय इमारत अथवा शाळामहाविद्यालयांमध्ये असतात. काही वेळेला तात्पुरत्या स्वरुपात मतदान केंद्र देखील उभारले जातात. यावर्षीच्या निवडणुकांसाठी सुमारे 1100 मतदान केंद्र तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आले आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने विविध अत्यावश्यक सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. राज्यात शहरी आणि ग्रामीण मतदान केंद्रांवर सारख्याच सुविधा दिल्या जातात. मात्र स्थानिक परिस्थितीनुसार निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर त्यामध्ये बदल केला जातो. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 95 हजार 473 एकूण मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये वाढ होऊ शकते.

जिल्हानिहाय मतदान केंद्रांची अनुक्रमे ग्रामीण व शहरी भागातील संख्या (सुमारे) अशी (कंसांत एकूण संख्या) :नंदूरबार-1100, 190 (1300) ; धुळे-1300, 300 (1600) ; जळगाव-3000,500 (3500) ; बुलढाणा-1800,400 (2200) ;अकोला-1100,500 (1600) ; वाशिम-900, 80 (980) ; अमरावती-1900, 617 (2600); वर्धा-1076, 238 (1300) ; नागपूर-2100, 2200 (4300) ; भंडारा-1165, 40 (1205); गोंदिया-1153, 128 (1280) ;गडचिरोली-929, 01 (930) ; चंद्रपूर-1170, 890 (2070) ; यवतमाळ-2280, 200 (2491) ; नांदेड-2495, 460 (2950) ;हिंगोली-866, 135 (1000) ; परभणी-1040, 450 (1500) ; जालना-1390, 240 (1633); औरंगाबाद-1950, 1000 (2957) ;नाशिक-2980, 1450 (4440) ; ठाणे-1273, 5215 (6488) ; मुंबई उपनगर-286, 7011 (7297) ; मुंबई शहर-0, 2592 (2592) ;रायगड-2470, 220 (2693) ; पुणे-3287, 4379 (7666) ; अहमदनगर-2922, 800 (3722) ; बीड-1785, 526 (2310) ;लातूर-1925, 70 (1995) ;उस्मानाबाद-1322, 160 (1490) ;सोलापूर-2580, 890 (3480) ;सातारा-2738, 230 (2970) ;रत्नागिरी-1673, 26 (2699) ; सिंधुदुर्ग-890, 21 (915) ; कोल्हापूर-2490, 820 (3321) ;सांगली-1890, 500 (2400) ;पालघर-1800, 310 (2120). राज्यात सहाय्यकारी मतदान (ऑक्झिलरी) केंद्रांची संख्या निश्चितीनंतर एकूण मतदान केंद्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील शाळा, शासकीय इमारतीत ९० हजाराहून अधिक मतदान केंद्र राज्यातील शाळा, शासकीय इमारतीत ९० हजाराहून अधिक मतदान केंद्र Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 31, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.