
मुंबई : मंत्रालय अधिकारी महासंघामार्फत आज मंत्रालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंत्रालयातील परिषद सभागृहात परिसंवाद आयोजित करुन अधिकाऱ्यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
साहित्यिक लता गुठे, क्ष किरण तज्ज्ञ डॉ. शिल्पा लाड यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
साहित्यिक लता गुठे यांनी यावेळी आपला पाथर्डी ते मुंबईपर्यंतचा प्रवास कसा झाला याविषयी विवेचन केले. कोणतीही गोष्ट ठरवलेल्या उद्दिष्टानुसार पूर्ण करावी. न्यूनगंड न बाळगता महिलांनी वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
क्ष किरण तज्ज्ञ डॉ. शिल्पा लाड यांनी ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, हातात घेतलेले काम योग्य प्रकारे करणे,नेहमी आनंदी राहणे, इतरांनाही आनंद देणे यातून तणावमुक्ती साध्य करता येते. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून वाटचाल केल्यास अनेक अवघड गोष्टी सोप्या होतात, असे त्यांनी सांगितले.
मंत्रालय अधिकारी महासंघाचे सरचिटणीस विष्णू पाटील, महिला संघटक सोनलस्मित पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती) मीनल जोगळेकर यांनी केले.
मंत्रालय अधिकारी महासंघामार्फत जागतिक महिला दिन साजरा
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 09, 2019
Rating:
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 09, 2019
Rating:
No comments: