Seo Services
Seo Services

ग्रामविकास विभागात १३ हजार ५१४ जागांची महाभरती


ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा निर्णय

मुंबई  : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी निर्णय घेत राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी शासकीय नोकरीचे दालन खुले करून दिले आहे. ग्रामविकास विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या २१ पदांसाठी १३ हजार ५१४ जागांची मेगा भरती होणार आहे. या मेगा भरतीमुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरूणांना सुवर्णसंधी चालून आली आहे.

ग्रामविकास विभागाअंतर्गत विविध प्रकारच्या २१ पदांवर ही मेगाभरती होणार आहे. सध्या जिल्हा परिषदेत अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरल्यास कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी तर होईलचशिवाय नव्या उमेदवारांना देखील नोकरीची संधी मिळणार आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी मेगाभरतीबाबतचा हा निर्णय घेतल्यानंतर विभागाने पद भरतीचे आदेश काढले आहेत.

या पदांसाठी होणार मेगाभरती

ग्रामविकास विभागाच्या आस्था ८ अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)कनिष्ठ अभियंता (विद्युत)कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)विस्तार अधिकारी (पंचायत),विस्तार अधिकारी (कृषी)विस्तार अधिकारी (सांख्यिकी)ग्रामसेवक (कंत्राटी),आरोग्य पर्यवेक्षकऔषध निर्माताप्रयोगशाळा तंत्रज्ञआरोग्य सेवक  (पुरूष ५० टक्के)आरोग्य सेवक (पुरूष ४० टक्के)आरोग्य   सेविकास्थापत्य अभियंता (सहायक)पशुधन पर्यवेक्षकवरिष्ठ सहायक (लेखा)वरिष्ठ सहायक (लिपिक),अंगणवाडी पर्यवेक्षिकाकनिष्ठ सहायक (लिपिक)कनिष्ठ लेखा अधिकारी व कनिष्ठ यांत्रिकी आदी पदांसाठी ही भरती होणार आहे.

ही मेगा भरती राज्यातील सहाही विभागात होणार असून सर्वाधिक जागा पुणे विभागात २ हजार ७२१ असून तर त्या खालोखाल औरंगाबाद विभागात २ हजार ७१८ आहेत. नाशिक विभागात २ हजार ५७४कोकण विभागात २ हजार ५१,नागपूरमध्ये १ हजार ७२६ तर अमरावती विभागात १ हजार ७२४ अशा एकूण १३ हजार ५१४ जागांवर तरूणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. सर्व पदांची भरती व त्याचे आरक्षण शासन नियमानुसार असून तशी जाहिरात प्रत्येक जिल्हा परिषदेकडून  वर्तमानपत्रात प्रसिद्ध होण्यास सुरवात होणार आहे.
ग्रामविकास विभागात १३ हजार ५१४ जागांची महाभरती ग्रामविकास विभागात १३ हजार ५१४ जागांची महाभरती Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 02, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.