Seo Services
Seo Services

निवडणुकीचे बिगूल अखेर वाजले

Image result for लोकसभा निवडणुका


नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुका केव्हा जाहीर होणार याकडे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशातील जनतेचे लक्ष लागले होते. मात्र, आता या निवडणुकीचे बिगूल अखेर वाजले. देशभरात सात टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान मतदान होणार असून, या निवडणुकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे आजपासून आचारसंहिता लागू केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज (रविवार) दिली. असेही ते म्हणाले.

विज्ञान भवन येथे पहिल्यांदाच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. यावेळी आयोगाने या सर्व बाबींची माहिती दिली.लोकसभेच्या 543 जागांसाठी निवडणूक होणार आहे. अरोरा म्हणाले, राजकीय पक्षांची चर्चा झाली आहे. देशातील मतदारांची संख्या सुमारे 90 कोटींपर्यंत आता गेली आहे. दीड कोटी नोकरदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. विविध राज्यांतील परीक्षांचाही मतदानाच्या तारखा नियोजित करण्यापूर्वी विचार करण्यात आला. 2014 पेक्षा 7 कोटी मतदार वाढले. लोकसभेसाठी 10 लाख मतदान केंद्र असणार आहेत. ईव्हीएमवर उमेदवारांचा फोटोही असणार आहे. आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली असून, याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही अरोरा म्हणाले.

तसेच आचारसंहिता भंग झाल्यास त्याची तक्रार मोबाईलवरूनही करता येणार आहे. ईव्हीएमवर जीपीएसच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार आहे. 'पेड न्यूज'वर कडक कारवाई केली जाईल.

महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये  मतदान

11 एप्रिलला मतदानाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात. दुसरा टप्पा 18 एप्रिल, तिसरा टप्पा 23 एप्रिल, चौथा टप्पा- 29 एप्रिल, पाचवा टप्पा -6 मे, सहावा टप्पा - 12 मे, सातवा टप्पा-19 मे अशा टप्प्यांत मतदान होईल.

11 एप्रिल - 7 जागा
18 एप्रिल - 10 जागा
23 एप्रिल - 14 जागा
29 एप्रिल - 17 जागा

LIVE पत्रकार परिषद इथे पाहू शकता -

https://eci.gov.in/home



निवडणुकीचे बिगूल अखेर वाजले निवडणुकीचे बिगूल अखेर वाजले Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 10, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.