Seo Services
Seo Services

पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी राहुल कलाटे, तर सदस्यपदी स्वाती ढमाले आणि शैलेंद्र मोरे यांची निवड



पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांची पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच पिंपरी चिंचवडमधीलच शिवसेनेचे कार्यकर्ते शैलेंद्र मोरे. आणि स्वाती ढमाले. यांची पुणे म्हाडाच्या सदस्यपदी निवड झाली आहे.

भाजप-शिवसेना युती सरकारने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच राज्याच्या विविध महामंडळांवर कार्यकर्त्यांची वर्णी लावली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांची पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवडमधील शिवसेनेचे चिखली येथील कार्यकर्ते शैलेंद्र मोरे आणि प्राधिकरणातील स्वातीताई ढमाले यांची पुणे म्हाडाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी राहुल कलाटे, तर सदस्यपदी स्वाती ढमाले आणि शैलेंद्र मोरे यांची निवड पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी राहुल कलाटे, तर सदस्यपदी स्वाती ढमाले आणि शैलेंद्र मोरे यांची निवड Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 13, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.