Seo Services
Seo Services

आचारसंहितेबाबत भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती


मुंबई : 'आदर्श आचारसंहिता'आणि निवडणूक प्रक्रियेविषयी सर्व माहिती भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://eci.nic.in यावर नागरिकांना सहज बघता येणे शक्य आहे.

निवडणुकीत सामील मान्यताप्राप्त अथवा अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष अथवा अपक्ष यांची माहितीमतदानाचा दिवस, मतदान केंद्रनिवडणुकीचा जाहीरनामामिरवणुकाप्रचारघोषणा व सर्वसामान्य व्यवहार यात काय मर्यादा पाळाव्यात यासंबंधी या संकेतस्थळावर स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत.

आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्ष व उमेदवारांनी 'काय करावे किंवा करु नये'(DOs & DON’Ts) याची माहिती मुख्य निर्वाचन अधिकारीमहाराष्ट्र राज्य यांच्याhttps://ceo.maharashtra.gov.inया संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये राजकीय पक्ष व निवडणुकीसाठी उभ्या असणाऱ्या उमेदवारांनी कशी वर्तणूक ठेवावी याचा विस्तृत तपशील नमूद करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहिता ही निवडणुका मुक्त वातावरणात पार पडाव्यातत्यात कोणत्याही स्वरुपाचे गैरव्यवहार होऊ नयेत या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.

'आदर्श आचारसंहितेच्याकालावधीत निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण भारतीय निवडणूक आयोगामार्फत ठेवण्यात येणार आहे. याकरिता राज्य आणि जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या जाहिरातींचे प्रमाणिकीकरण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यात आल्या आहेत.

आचारसंहितेच्या काळात भारतीय निवडणूक आयोगामार्फत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटपमंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापरएकत्रित निधीतून शासकीय जाहिराती प्रसिद्ध करणेनवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणाशासकीय सार्वजनिक /खासगी संपत्तीचे विद्रुपीकरण इत्यादी बाबींवर निर्बंध आले आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ नुसार भारत निवडणूक आयोगाला केंद्र आणि राज्य शासनराजकीय पक्षउमेदवार यांच्यावर लक्ष ठेवण्याचा अधिकार मिळतो.

उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे व खर्चाचे तपशील वेळोवेळी मुख्य निवडणूक अधिकारीमहाराष्ट्र राज्य यांच्याhttps://ceo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जातात.
आचारसंहितेबाबत भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती आचारसंहितेबाबत भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 21, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.