Seo Services
Seo Services

हरिसालच्या डिजिटल गाव जाहिरातीत असलेला मॉडेल मनसेच्या मंचावर


मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंनी मोदींनी जाहीर केलेल्या डिजिटल गावाची पोलखोल केली. या संदर्भातला व्हिडिओ राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सादर केला. या जाहिरातीत मॉडेल म्हणून काम केलेला तरूणच राजसाहेब ठाकरेंनी मनसेच्या मंचावर आणला. या तरूणाला भाजपावाले शोधत आहेत. त्याला सांगत आहेत झालं-गेलं विसरून जा, परत ये. मात्र हा तरूण आपल्या संपर्कात आला. मी जेव्हा हरिसालची पोलखोल केली, त्यानंतर मुख्यमंत्री म्हटले की, राज ठाकरे तिथे गेलेच नाहीत. आता हा तरूणच मी तुम्हाला दाखवला आहे. तसंच तिथली परिस्थिती काय आहे? ही तुम्हाला पुन्हा एकदा दाखवली. आता मुख्यमंत्र्यांकडे यावर काय उत्तर आहे असा प्रश्न राजसाहेब ठाकरेंनी उपस्थित केला.

हरिसाल या गावात डिजिटलचा ड ही नाही हे वास्तव राजसाहेब ठाकरेंनी गुढी पाडवा मेळाव्यात दाखवलं होतं. त्यानंतर या गावासंदर्भातला व्हिडिओच राजसाहेब ठाकरेंनी सादर केला होता. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या गावाची पोलखोल केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी हे आरोप फेटाळले. आता पुन्हा एकदा राजसाहेब ठाकरेंनी तो व्हिडिओ दाखवून डिजिटल गावाची पोलखोल केली आणि तरूणालाच मंचावर आणत भाजपाच्या दाव्यांना धक्का दिला.

एवढंच काय तर डिजिटल गावाची जाहिरातही, त्या गावात नाही तर भलतीकडेच शूट झाली होती. असाही आरोप राजसाहेब ठाकरेंनी केला आहे. डिजिटल गावाच्या जाहिरातीत मॉडेल असलेला मुलगा, नोकरीसाठी पुण्यात वणवण फिरतो आहे. असंही राजसाहेब ठाकरेंनी म्हटलं आहे.
हरिसालच्या डिजिटल गाव जाहिरातीत असलेला मॉडेल मनसेच्या मंचावर हरिसालच्या डिजिटल गाव जाहिरातीत असलेला मॉडेल मनसेच्या मंचावर Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 16, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.