Seo Services
Seo Services

‘सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेतून निवडणूक प्रक्रियेसाठी उपयुक्त टिप्स !


लोकसभा निवडणूक २०१९/विशेष वृत्त

मुंबई : लोकसभा निवडणूकीत आयोगासह उमेदवारआणि विविधराजकीय पक्ष सायबर जगताचा मोठ्या  प्रमाणात वापर करीत आहेतनिवडणूकविषयक माहितीची सुरक्षिततासंरक्षित पासवर्डईमेल्ससमाज  माध्यम वापरतानाघ्यावयाची काळजीफेक न्यूजसह खोडसाळ प्रचार मोहीम राबविण्यासाठीस्पिअर फिशिंग स्कॅम्स’ करणाऱ्यांपासून बचावासाठी कोणत्या दक्षता घ्याव्यातयाच्या सूचना ‘महाराष्ट्र सायबर’ कार्यालयाने  ‘सायबर सुरक्षा’ या पुस्तिकेद्वारेनिवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया अधिक सुटसुटीतपणे करण्यासाठीआयोगाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचानव्या ॲप्सचा मोठ्या प्रमाणात उपयोग केलाजात आहेउमेदवारांसह राजकीय पक्षांनीही समाज माध्यमांचा वापर  प्रचारासाठीसुरु केला आहेसमाज माध्यमांचा गैरवापर होऊ नये आणि निवडणूक प्रक्रियातांत्रिकदृष्ट्या  सुरक्षित रहावी यासाठी ‘महाराष्ट्र सायबर’ ने पुढाकार घेतला आहे.राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदार  संघातील निवडणूक यंत्रणेला मराठीहिंदी,इंग्रजीगुजराती आणि ऊर्दू या भाषेतून प्रकाशित केलेल्या ‘सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेतून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याचे महाराष्ट्र सायबरचे विशेषपोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.

या पुस्तिकेत समाजमाध्यमांवरील बातम्याट्रोलिंगप्रायोजित मजकूर याबाबतीतजनजागृती करण्याच्या सूचनाफेक ॲप्स आणि संकेतस्थळांबद्दल जागृतीकरण्याबरोबरच व्यक्तिगत आणि बाह्य उपकरणांच्या वापराविषयी  दक्षताघेण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

समाज माध्यमांवरील फेक न्यूजची पडताळणी करण्यासाठी मोलाच्या टिप्स दिल्याआहेतफेसबुकपोस्टच्या वरउजव्या बाजूच्या कोपऱ्यात ‘ही फेक न्यूज स्टोरीआहे’ हा पर्याय तर व्हॉटसअपवर अफवा अथवा माहिती खातरजमा करण्यासाठीव्हॉटसअप चेकपॉईन्ट टीपला’ वर पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्याआहेत.  व्हॉटसअप वर निवडणुकीच्या संदर्भातील खोट्या बातम्याअफवा,प्रक्षोभक मजकूरचित्रांबद्दल सतर्क  राहण्यासह त्याविषयी महत्त्वाच्या टिप्सदेण्यात आल्या आहेत.

निवडणूक प्रक्रिया राबविताना कोणत्या गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे हेस्पष्ट करतानाच भारत सरकारने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या ४२ ॲप्सचीयादी प्रसिद्ध केली आहेनिवडणूक आयोगाच्या सी-व्हिजिलसह इतर अधिकृतॲप्ससंकेतस्थळे तसेच तक्रारींसाठी महत्वाच्या नोडल्स संस्थांची माहिती यापुस्तिकेत देण्यात आली आहेहॅक अथवा हायजॅक झालेल्या सोशल मीडियाखात्यांच्या बाबतीत महाराष्ट्र सायबरशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेआहे.  ही पुस्तिका राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रसायबर’ कार्यालयाने तयार केली आहे.
‘सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेतून निवडणूक प्रक्रियेसाठी उपयुक्त टिप्स ! ‘सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेतून निवडणूक प्रक्रियेसाठी उपयुक्त टिप्स ! Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 09, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.