Seo Services
Seo Services

जिल्‍हाधिकारी जीतेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत दिव्यांग मतदार संपर्क सभा संपन्न


अकोला : जिल्ह्यातील एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहु नये यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली दिव्यांग मतदार संपर्क नियोजन सभा संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या परिविक्षाधिन अधिकारी डॉ.मिताली सेठी, मनपा आयुक्त संजय कापडणीस, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश अपार, गजानन सुरंजे आदींची उपस्थिती होती.

दिव्यांग मतदारांना मतदान करण्याचा सुखद अनुभव मिळावा यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर सर्वप्रकारच्या सोई-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सुविधा तसेच त्यांना ने-आण करण्यासाठी सहाय्यक तसेच मतदान केंद्रावर रॅमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बी.एल.ओ. यांनी आपल्या मतदान केंद्र परिसरातील दिव्यांगाची माहिती घेवुन त्यांची यादी अद्ययावत करुन मोबाईल क्रमांकासह नोडल ऑफीसरकडे सोमवारपर्यंत जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. प्रत्येक सहाय्यकानी दिव्यांग मतदारांच्या घरी जावून संपर्क साधून त्यांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावी अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

गट शिक्षणाधिकारी व शाळांचे केंद्र प्रमुख यांनी आपल्या परिसरातील कोणताही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहु नये यासाठी नियोजन करावे. तसेच गरोदर महिलांची भेट घेवून आशा सेविकांनी मतदानाच्या दिवशी मतदानासाठी त्यांना प्रवृत्त करावे. मतदान केंद्रावर पेयजल वाटप व्यवस्था अंगणवाडी सेविका पाहतील तसेच मेडीकल कीट व पाळणाघराची व्यवस्था आशा सेविका पाहतील. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी सर्वप्रकारची सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनी मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जीतेंद्र पापळकर यांनी केले आहे.
जिल्‍हाधिकारी जीतेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत दिव्यांग मतदार संपर्क सभा संपन्न जिल्‍हाधिकारी जीतेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत दिव्यांग मतदार संपर्क सभा संपन्न Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 13, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.