.jpg)
महिलांच्या हाती मतदान केंद्रांचे व्यवस्थापन
लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र असणार असून याला `सखी मतदान केंद्र` असे म्हटले जाणार आहे. ‘सखी मतदान केंद्र’ अधिकाधिक आर्कषक आणि सुंदर बनविण्यासाठी रांगोळी, रंगरंगोटीसह येथील साफ सफाईवर विशेष भर देण्यात येणार आहे. ‘सखी मतदार केंद्र’ स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. सखी मतदार केंद्रावर अधिकारी, कर्मचारी महिला असतील. जिल्ह्यात एकूण ९ लक्ष ३४ हजार ५४९ मतदार आहेत. यात ४ लक्ष ८९ हजार २९५ पुरुष मतदार, ४ लक्ष ४५ हजार २५० महिला मतदार आणि ४ इतर मतदारांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया ही महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. यामध्ये वाशिम विधासभा मतदारसंघातील वाशिम येथील शिवाजी विद्यालय खोली क्र. ३ व बाकलीवाल विद्यालय खोली क्र. ७ येथील मतदान केंद्र, कारंजा विधानसभा मतदारसंघातील काळी कारंजा येथील जिल्हा परिषद शाळा खोली क्र. २ दक्षिण भाग व किन्हीरोकडे येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र आणि रिसोड विधानसभा मतदारसंघातील रिसोड येथील शिवाजी विद्यालयातील खोली क्र. १ व भारत माता मुलींची शाळा खोली क्र. १ येथील मतदान केंद्रांचा समावेश आहे.
अ.क्र.
|
विधानसभा मतदारसंघ
|
मतदान केंद्राचा क्रमांक व नाव
|
मतदार संख्या
|
१.
|
३३- रिसोड
|
२७३-रिसोड
|
१०९१
|
२.
|
२९०-रिसोड
|
७१०
| |
३.
|
३४-वाशिम
|
२२८-वाशिम
|
६०२
|
४.
|
२३१-वाशिम
|
६९२
| |
५.
|
३५-कारंजा
|
१००- काळी कारंजा
|
१२७०
|
६.
|
१८९-किन्हीरोकडे
|
७५६
|
जिल्ह्यात सहा ‘सखी मतदान केंद्र’
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 03, 2019
Rating:
No comments: