Seo Services
Seo Services

राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती साजरी


मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज चैत्यभूमी येथे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामुदायिक त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यावेळी उपस्थित होते.

चैत्यभूमी परिसरात मुंबई महानगरपालिकेतर्फे लावण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित सचित्र प्रदर्शनाला राज्यपालांनी भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त अजोय मेहता व सहआयुक्त अश्विनी जोशी उपस्थित होते.
राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती साजरी राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती साजरी Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 14, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.