Seo Services
Seo Services

पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी १४ हजार ९१९ मतदान केंद्र


44 हजार ईव्हीएम आणि 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र,
मतदान प्रक्रियेसाठी 73 हजार 837 कर्मचारी कार्यरत

मुंबई लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात मतदारसंघांमध्ये दि. 11 एप्रिल रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी सुरु आहे.  पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण 116उमेदवार आहेत. सात मतदारसंघात 14 हजार 919 मतदान केंद्र आहेत तर 1कोटी 30 लाख 35 हजार मतदार आहेत. त्यामध्ये 66 लाख 71 हजार पुरुष तर 63लाख 64 हजार महिला आणि 181 तृतीयपंथी मतदार आहेत. सुमारे 44 हजार ईव्हीएम यंत्र आणि 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत. सुमारे 73 हजार837 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

राज्यात एकूण 4 टप्प्यात मतदान होणार असून वर्धारामटेकनागपूरभंडारा-गोंदियागडचिरोली-चिमूरचंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघांमध्ये 11 एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. वाढते तापमान लक्षात घेता या मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी तसेच सावलीची व्यवस्था करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

मतदानासाठी लागणारे साहित्य जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गडचिरोली- चिमूर या नक्षलग्रस्त भागात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3अशी करण्यात आली आहे.

वर्धा मतदारसंघात सुमारे 2 हजार 26 एवढे मतदान केंद्र असून 8 लाख 93  हजार पुरुष तर 8 लाख 48 हजार महिला मतदार आहेत. या मतदार संघात 17 लाख 41हजार एकूण मतदार आहेत. रामटेक मतदार संघात 2 हजार 364 मतदान केंद्र असून 9 लाख 96 हजार पुरुष तर 9 लाख 24 हजार महिला असे एकूण 19 लाख21 हजार मतदार आहेत. नागपूर मतदारसंघात 2 हजार 65 मतदान केंद्र आहेत.10 लाख 96 हजार पुरुष तर 10 लाख 63 हजार महिला असे एकूण 21 लाख 60हजार एकूण मतदार आहेत. भंडार-गोंदिया मतदारसंघात 2 हजार 184 मतदान केंद्र आहेत. 9 लाख 5 हजार पुरुष तर 9 लाख 3 हजार महिला असे एकूण 18लाख 8 हजार मतदार आहेत.

गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी 1 हजार 881 मतदान केंद्र असून 7 लाख 99हजार पुरुष आणि 7 लाख 80 हजार महिला असे एकूण 15 लाख 80 हजार मतदार आहेत. चंद्रपूर मतदार संघामध्ये 2 हजार 193 मतदान केंद्र असून 9 लाख86 हजार पुरुष आणि 9 लाख 22 हजार महिला असे एकूण 19 लाख 8 हजार मतदार आहेत. यवतमाळ-वाशिम मतदार संघामध्ये 2 हजार 206 मतदान केंद्र आहेत. 9 लाख 93 हजार पुरुष मतदार तर 9 लाख 21 हजार महिला असे एकूण19 लाख 14 हजार मतदार आहेत.

ज्या मतदारसंघात 15 पेक्षा जास्त उमेदवार आहेत, अशा मतदान केंद्रांवर 2 बॅलेट युनिट बसविण्यात येतात. त्यासोबत 1 कंट्रोल युनिट असते. पहिल्या टप्प्याकरिता26 हजार बॅलेट युनिट आणि 18 हजार कंट्रोल युनिट देण्यात आले असून 20हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. बहुतांश सर्वच मतदान केंद्रांवर राखीव यंत्र देण्यात आली आहेत.
पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी १४ हजार ९१९ मतदान केंद्र पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी १४ हजार ९१९ मतदान केंद्र Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 05, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.