पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने लोकसभा निवडणूक २०१९ च्या मतदार जनजागृती अभियानांतर्गंत २०५, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे मुख्य कार्यालयात मतदान जनजागृतीपर पथनाटयाचे व चित्ररथाचे उदघाटन चिंचवड विधानसभेच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहरात मतदार जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तयार केलेल्या या चित्ररथाव्दारे व पथनाटयांव्दारे मतदार जनजागृती करण्यात येणार असून विविध ठिकाणी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
थेरगाव येथे झालेल्या या कार्यक्रमास मतदार नोंदणी अधिकारी डॉ.प्रविण आष्टीकर, सहय्यक आयुक्त अण्णा बोदडे, स्मीता झगडे, नोडल अधिकारी रमेश भोसले आदी उपस्थित होते.
चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृती अभियान
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 10, 2019
Rating:

No comments: