Seo Services
Seo Services

महाराष्ट्रात किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला



मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील चौदा मतदारसंघातील दोन कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदारांपैकी 62.08 टक्के म्हणजेच जवळपास एक कोटी 60 लाख 10 हजार 269 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये हातकणंगले (70.76 टक्के) सर्वात अव्वल ठरलं. सुरुवातीला कोल्हापुरातील मतदानाची टक्केवारी सर्वाधिक असल्याचं समोर आलं होतं. कोल्हापुरात 69.73 टक्के मतदान झालं.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, अहमदनगर, मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, कोकणातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 14 मतदारसंघांमध्ये मतदान झालं.
महाराष्ट्रात किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला महाराष्ट्रात किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 25, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.