.jpg)
अकोला : सेकंड रॅन्डमायझेशन नंतर ईव्हीएम/व्हीव्हीपॅटची तयारी व सिलींगकरिता सहाही विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी निवडणूक निरीक्षक सर्व ठिकाणी उपस्थिती राहु शकत नाही म्हणून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ०६-अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणूक निरीक्षक सामान्य विनोदसिंह गुंजीयाल यांनी प्रत्येक मतदारसंघासाठी दोन याप्रमाणे एकूण १२ मायक्रो ऑब्जर्वरची नियुक्ती केली आहे
अकोला लोकसभा मतदारसंघात एकाच वेळी सर्व सहा विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट सिलींगचे काम ७ एप्रिल ते १३ एप्रिल या दरम्यान होणार आहे. यासाठी बँकेचे अधिकारी व एलआयसीचे अधिकारी यांची मायक्रो ऑब्जर्वर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांची बैठकी निवडणूक निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात आज घेण्यात आली यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, संपर्क अधिकारी गोपाळ माळवे, सहायक संपर्क अधिकारी श्री. खान, सर्व मायक्रो ऑब्जर्वर उपस्थित होते.
२८-अकोट विधानसभा मतदारसंघासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे मयूर बाकडे, सेंट्रल बँकेचे संदीप खेडकर, २९-बाळापूर विधानसभा मतदार संघासाठी एलआयसी अकोटचे पी.एन.केने, एसबीआय अकोटचे सुनील सराटे, ३०-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी सेंट्रल बँकेचे विकास कुमार व संदीप निनावे, ३१-अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी एसबीआय मालेगावचे प्रशांत वानखडे व योगेश निलखन, ३२-मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघासाठी एसबीआय डाबकी रोडचे उमेश काळणे व भुपेश चोपडे तसेच ३३-रिसोड विधानसभा मतदारसंघासाठी एसबीआयचे चेतन पवनारकर व आदित्य देशमुख यांची मायक्रो ऑब्जर्वर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ईव्हीएम मशिनच्या तयारीसाठी मायक्रो ऑब्जर्वरची नियुक्ती
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 04, 2019
Rating:
No comments: