मुंबई : लोकसभा निवडणूक2019 अंतर्गत राज्यातील तिसऱ्या टप्प्याअंतर्गत 14 मतदारसंघात आतापर्यंत 195 उमेदवारांनी तर चौथ्या टप्प्यात 17 मतदारसंघात 9 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
तिसऱ्या टप्प्याअंतर्गत आज 81उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघात 28मार्चपासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येत आहेत. तिसऱ्या टप्प्यात 4 एप्रिल2019 ही नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. आज दि. 3 एप्रिल रोजी 81 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. मतदारसंघनिहाय आज दाखल आणि कंसात आजपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. जळगाव मतदारसंघात आज 2 (आजपर्यंत 8 उमेदवार),रावेर-5 (7), जालना-8 (21),औरंगाबाद 12 (25), रायगड 4 (12),पुणे-9 (13), बारामती-6 (13),अहमदनगर- 8 (12), माढा-9 (29),सांगली-4 (10), सातारा 1 (9),रत्नागिरी-सिंधुदुर्ग-2 (7), कोल्हापूर 10 (17) आणि हातकणंगले मतदारसंघात आज एका उमेदवाराने तर आजपर्यंत12 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली.
5 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील अर्जांची छाननी होणार असून 8 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे. चौथ्या टप्प्यात17 मतदारसंघात आज 5 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली असून आतापर्यंत एकूण 9 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. नाशिक मतदारसंघात आज 2तर पालघर, मुंबई उत्तर-मध्य आणि मुंबई दक्षिण या मतदारसंघातून प्रत्येकी एका उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले. चौथ्या टप्प्यात 2 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया 9 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या टप्प्यातील अर्जांची छाननी 10 एप्रिल रोजी होणार असून12 एप्रिलला अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.
टप्प्यात आतापर्यंत ९ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 04, 2019
Rating:

No comments: