मुंबई : फ्लिपकार्ट या आघाडीच्या इ-कॉमर्स मंचाने भारतीयांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मोहीम राबविली आहे.
नव्या मतदारांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न फ्लिपकार्ट आपल्या नवीन चित्रफितीद्वारे करत असून मतदान केल्यानंतर काय घडते, याबाबत प्रेक्षकांना जागरुकदेखील करत आहे.
समानतेच्या दिवसाबद्दल मत मांडताना, फ्लिपकार्टचे नाममुद्रा विपणन संचालक अपूर्व सेठी यांनी सांगितले की, सामाजिकदृष्टय़ा संबंधित विषयावर प्रभाव टाकणारा संवाद निर्माण करण्यासाठी आम्ही फ्लिपकार्ट समूहात नेहमीच प्रयत्नशील असतो. यापूर्वी लैंगिक समानतेच्या मुद्दय़ाला आम्ही पाठबळ दिले होते.
तर आता देशाच्या लोकशाहीतच समाविष्ट असलेल्या नवीन समानतेच्या कथेमध्ये गुंतवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या मोहिमेच्या माध्यमातून, ग्राहकांशी आम्हाला जोडण्याची, मतभेद विसरून एकत्र येण्याची वेळ म्हणून निवडणुकांकडे पाहण्यासाठी गरज असल्याचे आम्हाला वाटते.
मतदानाच्या समान अधिकारानुसार, मतदानाच्या दिवशी कोणाही व्यक्तीमध्ये कोणताही भेदभाव नसतो, यावर फ्लिपकार्टने या मोहिमेद्वारे भर दिला असल्याचे सांगण्यात आले.
भारतीयांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी फ्लिपकार्टने मोहीम राबविली
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 20, 2019
Rating:
No comments: