पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या संपूर्ण भागात खोदाई केली आहे. अनेक ठिकाणी खोदाईची कामे सुरु आहेत. पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकणे, जलनि:सारणाची कामे, भूमिगत गटारे आणि विविध केबल डक्टसाठी शहरात सर्वत्र खोदाई केली आहे. डांबरीकरणाचे रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खोदाई केल्यानंतर खड्डे बुजविले गेले नाहीत.
पिंपरी चिंचवड शहरातील विविध कामांसाठी खोदलेले रस्ते बुजवून घ्यावेत. खोदाईमुळे खराब झालेले रस्ते व्यवस्थित करावेत. 31 मेपर्यंत शहरातील सर्व रस्ते पुर्ववत करावेत, अशा सूचना प्रभारी शहर अभियंता राजन पाटील यांनी आठही क्षेत्रीय अधिका-यांना दिल्या आहेत.
रस्ता खोदाईमुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करुन पुर्ववत करावेत. 600 मिमीच्या व्यासावरील स्ट्रॉर्म वॉटर पाईपलाईन व चेंबर्स यांची साफसफाई करावी. धोकादायक इमारतींना नोटीस देऊन पुढील कारवाई करावी. आरोग्य विभागास स्थापत्य विभागामार्फत आवश्यकतेप्रमाणे मशिनरी उपलब्ध करुन द्यावी.
रस्त्यांवरील स्ट्रॉर्म वॉटर चेंबर्सच्या झाकणांची पाहणी करुन योग्य ती कार्यवाही करावी. पावसाळ्यात रस्त्यावरील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना शहर अभियंता राजन पाटील यांनी आठही क्षेत्रीय अधिका-यांना दिले आहेत. तसेच 25 मे पर्यंत काम पूर्ण केल्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध कामांसाठी खोदलेले रस्ते 31 मेपर्यंत शहरातील सर्व रस्ते पुर्ववत करावेत
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 16, 2019
Rating:
No comments: