मुंबई : बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) अधिनियमातील कलम 3(1)नुसार भारतीय इस्लामिक विद्यार्थी चळवळ (सिमी) या संघटनेस बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम1967 अन्वये केंद्र शासनाने बंदी घातली आहे. या संघटनेच्या विविध प्रकरणांची सुनावणी औरंगाबाद येथे दि.17 व 18 मे रोजी होणार आहे.
सिमी संघटनेच्या संबंधित प्रकरणांची तपासणी करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती मुक्ता गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या आवारात होणार आहे.
सिमी संघटनेसंबंधी प्रकरणाची सुनावणी १७ व १८ मे रोजी
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 08, 2019
Rating:
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 08, 2019
Rating:

No comments: