नवी दिल्ली : देशात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू झाले असले तरी बऱ्याच शहरांमध्ये त्यांच्या चार्जिंगची व्यवस्था नाही. पण ती सुरू होईल आणि विक्री वाढेल, असे अपेक्षित आहे. मात्र या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एक योजना आणली आहे. त्यानुसार ई-वाहनांना टोलमाफी देण्यात येणार आहे.
ई-वाहने ओळखता यावी, यासाठी त्यावर हिरव्या रंगाची नंबर प्लेट आणि क्रमांक पांढऱ्या रंगात असेल. त्यामुळे टोल नाक्यांवर ही वाहने पटकन ओळखता येतील. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना पत्रे लिहून, या ई-वाहनांची नंबर प्लेट हिरव्या रंगाची असावी, असे कळविले आहे. जी ई-वाहने टॅक्सी म्हणून वापरण्यात येतील, त्याच्या हिरव्या नंबरप्लेटवर वाहनांचा क्रमांक पिवळ्या रंगात असेल.
देशामधिल इलेक्ट्रिक वाहनांना मिळणार टोलमाफी :
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 04, 2019
Rating:
No comments: