Seo Services
Seo Services

जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रीस्तरीय बैठकीला नवी दिल्लीत प्रारंभ

नवी दिल्ली : बहुआयामी व्यापार प्रणाली समोरील आव्हानं आणि महत्वाचे मुद्दे याविषयी चर्चा करण्यासाठी विकसनशील आणि कमी विकसित देशांमध्ये शिष्टमंडळाचे केंद्रीय वाणिज्य सचिव डॉ. अनुप वाधवान यांनी नवी दिल्लीत स्वागत केले.
व्यापारविषयक द्विपक्षीय उपाययोजना असूनही जागतिक व्यापार प्रणाली महत्वाच्या वाटाघाटी तसेच अपीलांसंबंधी अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे डॉ. वाधवान यांनी यावेळी सांगितले. यामुळे विवाद सोडवण्याच्या जागतिक व्यापार संघटनेच्या अपीलांसंबंधीच्या प्रक्रियेत बाधा निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत अपीलासंबंधी मंडळाच्या समोर असलेल्या प्रलंबित मुद्यांबाबत तोडगा काढणे तसेच सुधारणांबाबत विकसनशील देश आणि कमी विकसित देशांसाठी महत्वपूर्ण असलेल्या मुद्यांविषयी चर्चा करणे आदींचा समावेश आहे.
जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रीस्तरीय बैठकीला नवी दिल्लीत प्रारंभ जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रीस्तरीय बैठकीला नवी दिल्लीत प्रारंभ Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 14, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.