Seo Services
Seo Services

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांनी शोधली प्लास्टिकचं विघटन करणारी बुरशी


पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र (बॉटनी) विभागातील संशोधकांनी पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असे संशोधन केले आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. परंतु विद्यापीठातील सांशोधकांनी प्लास्टिकचं विघटन करु शकणारी बुरशी शोधून काढली आहे.
खारफुटीच्या झाडांच्या मुळांवर ही बुरशी आढळून येते. एसपरगिलस या गटातील ही बुरशी आहे. मनीषा सांगळे, मोहमद शाहनवाज आणि डॉ अविनाश आडे यांनी हे संशोधन केले आहे. 2014 पासून यावर ते काम करत होते. या बुरशीमुळे पॉलिथीन या प्लास्टिकच्या प्रकारातील रेणू (मोलेक्युल) हे कमकुवत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याचे विघटन करण्याची पद्धत सोपी होते असेही त्यांना आढळले.
या संशोधनाची दखल नेचर मॅगझीननेही घेतली आहे. हे संशोधन सिद्ध करणारा रिसर्च पेपर एप्रिल महिन्यातील नेचर मॅगझीनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. पण हे संशोधन प्रत्यक्ष वापरात येण्यासाठी काही वेळ लागेल असे संशोधक आणि प्राध्यापक अविनाश आडे यांनी सांगितले.
संशोधकांनी सांगितले की, "हा या संशोधनाचा पहिला टप्पा आहे. याचा प्रत्यक्ष वापर सुरू होण्यासाठी यावरच आधारित संशोधनाच्या पुढच्या पायऱ्या पार कराव्या लागतील. साधारणपणे 5 वर्षांनंतर याचा प्रत्यक्ष वापर होऊ शकेल. या संशोधनाचं पेटंट घेण्यासाठीही विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत."
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांनी शोधली प्लास्टिकचं विघटन करणारी बुरशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांनी शोधली प्लास्टिकचं विघटन करणारी बुरशी Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 11, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.