पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
सकाळी ७ वाजता झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, प्रभारी आयुक्त संतोष पाटील, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसदस्या शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, मुख्य लेखापरीक्षक अमोद कुंभोजकर, मुख्य लेखापाल जितेंद्र कोळंबे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सह शहर अभियंता राजन पाटील, प्रवीण तुपे, मकरंद निकम, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, आशा राऊत, स्मिता झगडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, रविंद्र पवार, प्रविण घोडे, नितीन देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, उद्यान अधिक्षक डी.एन. गायकवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, सोमनाथ साबळे, प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाच्या चारुशिला जोशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 01, 2019
Rating:

No comments: