Seo Services
Seo Services

बारामती मतदारसंघामध्ये २०१४ च्या तुलनेत मतदान वाढले


पुणे : राज्यातील मतदानाच्या टक्केवारीवरून बरीच चर्चा झाली असली तरी प्रत्येक मतदारसंघातील प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी पाहता सर्वच ४८ मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत मतदान वाढले असून सर्वाधिक दोन लाख ३२ हजार ८२९ मतांची वाढ बारामतीमध्ये झाली आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केवळ ८४० मतांची वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

पहिल्या टप्प्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व कॉग्रेसचे नाना पटोले यांच्यात लढत असलेल्या नागपूरमध्ये मागच्या निवडणुकीपेक्षा सुमारे तीन टक्के कमी मतदान झाल्याचे दिसले. मात्र, प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी पाहता तेथील मतदानात २०१४ च्या तुलनेत ९६ हजार ७४२ मतांची वाढ झाली आहे. 

बारामती मतदारसंघात राज्यातील सर्वाधिक दोन लाख ३२ हजार ८२९ मतांची वाढ नोंदवली गेली आहे. बारामती मतदारसंघातील हे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार? नवमतदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मतदार असल्याचा भाजपचा दावा खरा ठरणार की पवारांची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी बारामतीकर हिरिरीने बाहेर पडल्याचे स्पष्ट होणार याबाबत आता उत्सुकता आहे.



बारामती मतदारसंघामध्ये २०१४ च्या तुलनेत मतदान वाढले बारामती मतदारसंघामध्ये २०१४ च्या तुलनेत मतदान वाढले Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 09, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.